टीम इंडियाचा आक्रमक खेळाडू रिंकू सिंहचे वडील आजही करतात घरोघरी सिलेंडर डिलिव्हरी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Rinku Singh Father Viral Video: गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट संघामध्ये डेब्यू केल्यानंतर रिंकू सिंह क्रिकेट जगतामध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससोबतच्या शानदार सीजननात्र रिंकूला गेल्या वर्षी भारतीय संघामध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली होती. टी20 मध्ये भारतासाठी त्याने 15 सामन्यांमध्ये 11 डावांत 89 च्या सरासरीने आणि 176 च्या स्ट्राइक रेटने 356 धावा केल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

गरिबीत गेले बालपण

रिंकूचे बालपण खूपच गरिबीमध्ये गेले होते. त्याचे वडील सिलेंडर डिलिव्हरी करत होते. तर आज देखील ते सिलेंडर डिलिव्हरी करतात. नुकतेच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Rinku Singh Father Viral Video) झाला आहे ज्यामध्ये रिंकूचे वडील खानचंद सिंह उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी करताना पाहायला मिळत आहेत. ज्यानंतर रिंकू सिंह पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे.

Rinku Singh Father Viral Video

Rinku Singh Father
Rinku Singh Father

व्हिडीओमध्ये खानचंद सिंह एक छोट्या अपे रिक्षामध्ये एलपीजी सिलेंडर लोड करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ तेव्हा समोर आला जेव्हा रिंकू सिंहने स्वतः खुलासा केला कि क्रिकेटमध्ये इतकी सफलता मिळवल्यानात्र देखील त्याचे वडील हि नोकरी सोडायला तयार नाहीत.

रिंकूने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये म्हंटले होते कि, मी माझ्या वडिलांना आराम करण्यासाठी सांगितले कारण आमच्याजवळ आता इतके आहे कि त्यांना सिलेंडर उचलण्याची गरज नाही. पण ते अजूनदेखील करतात आणि आपल्या नोकरीवर प्रेक करतात. जर कोणी आयुष्यभर काम केले असेल तर त्याला अडवणे खूपच कठीण आहे जोपर्यंत ते स्वतः थांबत नाहीत.

अलिगढमध्ये जन्मलेल्या रिंकूला आयपीएल 2024 च्या अगोदर 55 लाख रुपयांमध्ये केकेआर ने रिटेन केले आहे. केकेआरने त्याला पहिला 80 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. जरी त्याला पहिला सीजन चांगला राहिला नसला तरी पण त्यानंतर त्याने चांगलेच पुनरागमन केले.