हिरो आज लाँच करणार आपली पहिली ऑफरोडिंग इलेक्ट्रिक बाईक, फोटो झाले लीक

Hero Vida Electric Dirt: हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक आज भारत मोबिलिटी एक्सपो 2024 मध्ये सादर करणार आहे. हि बाईक कंपनीची विडा सिरीजची असणार आहे. ज्याची इलेक्ट्रिक स्कूटर विडा V1 आधीपासूनच मार्केटमध्ये मिळत आहे. या ई-बाईकचे फोटोज समोर आले आहेत. हि एक ड्रिट (Dirt) बाईक (Hero Vida Electric Dirt) आहे. जी खास करून ऑफरोडिंग साठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये दमदार बॅटरीसह पॉवरफुल मोटरचा सेटअप दिला जाऊ शकतो. जेणेकरून खराब रस्त्यांचावर आरामदायक अनुभव मिळेल.

Hero Vida Electric Dirt

कंपनी अपकमिंग इयरमध्ये 420cc लिक्विड-कूल्ड इंजन द्वारा ऑपरेट फ्लॅगशिप मॉडेलसह XPulse रेंजचा विस्तार करणार आहे. तर करिज्मा XMR सारखे 210cc लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते. हिरो भारतामध्ये एडवेंचर टूरर्स आणि डर्ट मोटर सायकल्सच्या वाढते चलन पाहून तयार करण्याचा प्रयत्न करेल. यामुळे कंपनी आपली विडा सीरीजची हि डर्ट मोटरसायकल सादर करणार आहे. भारत मोबिलिटी एक्स्पो 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे.

विडा डर्ट मोटरसायकलचे प्रोटोटाइप मॉडेल

हे विडा डर्ट मोटरसायकलचे प्रोटोटाइप मॉडेल आहे. हे लाँच केले जाणार नाही, किंवा जेव्हा लाँच होईल तेव्हा याचे फायनल प्रोडक्शन मॉडल कसे असेल याबद्दल कोणतीही माहिती नाही. विडा ई-डर्ट बाईकचे (Hero Vida Electric Dirt) फोटो पाहून हे स्पष्ट होते कि हे एक प्रोपर हार्डकोर प्रोटोटाइप आहे. याला पुढच्या आणि मागच्या व्हील्सला स्पोक दिले आहेत. फ्रंट व्हील बॅंक व्हीलच्या तुलनेमध्ये मोठे आहे. ते ऑफ-रोड साठी तयार केलेल्या टायरमध्ये गुंडाळलेले आहेत. बॉडी पॅनेलसह मुख्य फ्रेममध्ये बॅटरी पॅक ठेवण्यात आला आहे.

Hero Vida Electric Dirt Design

याच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये प्रेटी नॅरो फिनिशसोबत एक कॉम्पॅक्ट रीअर एंड, कॉर्नर वर विडा ब्रँडिंग, एक फ्लॅट सीट, एक वाईड हँडलबार, एक कॉम्पटिशन-स्पेक फ्रंट एंड आणि एक फ्लोटिंग फ्रंट फेंडर आहे., ब्रेकिंगसाठी फ्रंट आणि रियर वर डिस्क ब्रेक पाहायला मिळत आहेत. सस्पेंशन साठी बीफी फ्रंट फोर्क्स आणि रियरमध्ये मोनोशॉक दिला गेला आहे. हे हाय ग्राउंड क्लीयरेंस सह येते. तर ऑफरोडिंग साठी पूर्णपणे फरफेक्ट आहे. विडाने इटली येथील EICMA 2023 इवेंट मध्ये दोन इनोवेटिव इलेक्ट्रिक डर्ट बाइक कॉन्सेप्ट लिंक्स आणि एयरो पेश सादर केले होते.

हेही वाचा: 25 हजारात खरेदी करा HERO SPLENDOR PLUS XTEC, फीचर्स देखील आहेत दमदार