Salaar Box Office Collection Day 1: पठाण, जवान आणि डंकीला देखील टाकले मागे, सालारचे पहिल्या दिवशी शानदार ओपनिंग

Salaar Box Office Collection Day 1: प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सालार’ अखेर चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे. चित्रपट रिलीज होणार चित्रपटाने अनेक मोठे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. प्रभासच्याच्या सालारने बॉक्स ऑफिसवर तुफानी ओपनिंग (Salaar Box Office Collection Day 1) केली आहे. सालारने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 70 ते 80 करोडचे कलेक्शन केले. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे कि बाहुबली स्टार प्रभासचा चित्रपट कोणता नवीन रेकॉर्ड करते. प्रभासच्या चित्रपटाची शाहरुख खानच्या डंकी चित्रपटासोबत स्पर्धा आहे.

Salaar Box Office Collection Day 1

प्रभासच्या सालारचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Salaar Box Office Collection Day 1)

सालारचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. प्रभासच्या चित्रपटाकडून चाहत्यांना खूपच अपेक्षा आहेत. बाहुबली नंतर सालार चित्रपट प्रभासच्या करियरमधील पुढचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरू शकतो, असा त्याचा विश्वास आहे. चित्रपटामधील प्रभासचे अ‍ॅक्शन सीन पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. चित्रपटामध्ये प्रभासशिवाय श्रुति हासन लीड रोलमध्ये आहे. शिवाय चित्रपटामध्ये पृथ्वीराज सुकुमारन, जगपति बाबू आणि टीनू आनंद सारखे कलाकार आहेत. श्रुति आणि प्रभास चा हा पहिला चित्रपट आहे.

सालार बनला सर्वात जास्त अ‍ॅडवांस बुकिंग करणारा चित्रपट

विशेष म्हणजे प्रभासच्या सालारने (Salaar) अ‍ॅडवांस बुकिंग मध्ये शाहरुख खानच्या डंकीला मागे टाकले आहे. इतकेच नाही तर यूएसएमध्ये 2023 मध्ये सर्वात जास्त अ‍ॅडवांस बुकिंग करणारा चित्रपट ठरला आहे. याआधी प्रभास साहो आणि आदिपुरुष चित्रपटामध्ये पाहायला मिळाला होता. हे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले होते. आता सालार चित्रपटाकडून प्रभासला खूप मोठ्या आशा आहेत.

हेही वाचा: ‘सालार- पार्ट 1 सीजफायर’ चं दुसरं गाणं ‘किस्सों में’ रिलीज, हृदयाला भिडतील गाण्याचे बोल

Leave a comment