Salaar Song Out: ‘सालार’ चे पहिले गाणे रिलीज, मैत्रीवर आधारित आहे गाणे, गाणे ऐकून KGF ची आठवण येईल

Salaar Song Out: ‘केजीएफ’ मेकर्स प्रशांत नीलच्या आगामी सालार चित्रपटामधील पहिले गाणे रिलीज झाले आहे. सध्या हा चित्रपट खूपच चर्चेमध्ये आहे. प्रत्येकजण प्रभास स्टारर या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. यादरम्यान ‘सालार- पार्ट 1 सीजफायर’ मधील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहेत. ज्याचे बॉल ‘सूरज ही छाव बनके’ असे आहेत. प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारनचे हे गाणे मैत्रीची एक परिभाषा कायम करताना पाहायला मिळत आहे.

Salaar Song Out

रिलीज झाले सालारचे पहिले गाणे – Salaar Song Out

नुकतेच सालार च्या मेकर्सकडून सोशल मिडियावर हि माहिती दिली गेली होती कि चित्रपटाचे पहिले गाणे लवकरच रिलीज होणार आहे. अशामध्ये आता ठरलेल्या वेळेनुसार प्रभासच्या सालारचे पहिले गाणे ‘सूरज ही छाव बनके’ मेकर्सकडून रिलीज (Salaar Song Out) करण्यात आले आहे. होम्बले फिल्म्सने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून या गाण्याचे ऑडिओ व्हर्जनमध्ये रिलीज केले आहे.

Salaar Song Out

या गाण्यात चित्रपटाची स्टार कास्ट प्रभास आणि पृथ्वीराज यांच्यातील मैत्रीची स्टोरी मांडण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या बालपणीची झलक देखील दाखवली गेली आहे. सालारच्या लेटेस्ट गाण्यासाठी सिंगर मेनुका पोडेल यांनी आपला आवाज दिला आहे. तर रवि बसरुर या गाण्याचे संगीत दिग्दर्शक आहेत. इतकेच नाही तर रिया मुखर्जीने या गाण्याचे बॉल लिहिले आहेत. फक्त हिन्दीमध्येच नाही तर सालारचे हे गाणे तमिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज केले आहे.

कधी होणार सालार रिलीज

या गाण्यानंतर आता दर्शक प्रभासच्या सालार चित्रपटाच्या रिलीजसाठी खूपच उत्सुक झाले आहेत. आदिपुरुष चित्रपटाच्या अपयशानंतर सालार पार्ट 1 सीझफायर’ हा चित्रपट प्रभाससाठी खूपच महत्वाचा ठरू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपटाच्या रिलीज डेट बद्दल बोलायचे झाले तर येत्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला दर्शकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Also Read: डंकी’ वर भारी पडणार प्रभासचा ‘सालार’, क्लायमॅक्स पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतील

Leave a comment