राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा, आता अयोध्यामध्ये करणार लग्न, आहे प्रभू श्री रामाचा भक्त

Sauth Star Arun Godwa and Aishwarya Engagement: कन्नड फिल्म स्टार अरुण राम गौडा आणि ऐश्वर्या यांनी 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर एंगेजमेंट केली होती आणि आता लवकरच दोघे लग्न करणार आहेत. अभिनेता अरुण राम स्वतःला श्रीरामाचा मोठा भक्त असल्याचे सांगतो. तो म्हणाला कि तो अयोध्यामध्येच विवाहबंधनात अडकणार आहे. अरुण राम आणि ऐश्वर्याच्या एंगेजमेंटमध्ये कुटुंबातील लोक आणि मित्र सामील झाले होते. आता दोघे याच वर्षी लग्नाचे प्लॅनिंग करत आहेत.

Sauth Star Arun Godwa and Aishwarya Engagement

ऐश्वर्या सोबत एंगेजमेंट (Sauth Star Arun Godwa and Aishwarya Engagement)

अरुण राम गौडाने ऐश्वर्यासोबतच्या एंगेजमेंट नुकेतच एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. तो म्हणाला कि श्रीरामाचा मोठा भक्त असल्यामुळे मला राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक दिवशी एंगेजमेंट करायची होती. एंगेजमेंट सेरेमनी खूपच साधी होती. (Sauth Star Arun Godwa and Aishwarya Engagement) आम्ही एका दशकापेक्षा जास्त काळापासून रिलेशनशिपमध्ये आहे.

Sauth Star Arun Godwa and Aishwarya Engagement

ऐश्वर्याची पहिली भेट आणि अयोध्येत लग्नाचा प्लॅन

अरुण राम पुढे म्हणाला कि ऐश्वर्यासोबत आमची पहिली भेट तेव्हा झाली होती जेव्हा दोघे गेलेयारा बालागा थिएटर ग्रुपमध्ये सामील झाले होते. त्यावेळी आम्ही खूप लहान होतो. आम्ही एकमेकांना पसंद करत होतो. पण तेव्हा आम्ही आमच्या करियरवर फोकस केले, कारण आम्हाला पुढे जायचे होते. आता आम्हाला वाटले कि आपल्या नात्याला पुढे नेण्याची हि योग्य वेळ आहे. इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने आमच्या दोघांचे कुटुंबीय देखील खुश आहेत.

Sauth Star Arun Godwa and Aishwarya Engagement

अरुणने पुढे ऐश्वर्याचे कौतुक करत म्हंटले कि ती खूप इमानदार आणि निष्ठावान आहे. माझा रेस्टॉरंटचा देखील बिजनेस आहे. तिला माहिती आहे कि समतोल राखणे किती कठीण आहे. माझा दिग्दर्शित चित्रपट लाँच केल्यानंतर या वर्षीच्या शेवटला आम्ही अयोध्यामध्ये लग्न करण्याचा प्लॅन करत आहोत. हे लग्न येत्या सहा महिन्यात होऊ शकते.

Sauth Star Arun Godwa and Aishwarya Engagement

हेही वाचा: लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांनंतर परिणीती चोप्राने दिली गुडन्यूज, म्हणाली; ‘मी आता लवकरच…’