शिवानी सुर्वे – अजिंक्य ननावरे यांनी गुपचूप उरकला साखरपुडा, फोटोज सोशल मिडियावर व्हायरल

Shivani Surve and Ajinkya Nanaware Engagement : मराठी चित्रपट सृष्टीमधील मधील आघाडीची अभिनेरी शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. दोघेहि 2024 मध्ये लग्न करणार असल्याचा अंदाज चाहते लावत होते. आता त्यांचा हा अंदाज अगदी खरा ठरला आहे. शिवानी आणि अजिंक्यने गुपचूप साखरपुडा उरकून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यांचे फोटोज (Shivani Surve and Ajinkya Nanaware Engagement) आता सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

पोस्ट शेयर करून चाहत्यांना दिली गुड न्यूज

अभिनेत्री शिवानी सुर्वेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेयर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. फोटो (Shivani Surve and Ajinkya Nanaware Engagement) शेयर करत तिने कॅप्शनमध्ये “अखेर बंधनात” असं लिहिलं आहे. अभिनेत्रीने साखरपुड्यातील खास क्षणांचे फोटो शेयर केले आहेत. फोटो शेयर करताच चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर कमेंट करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. फोटोमध्ये शिवानी आणि अजिंक्य हटके लुकमध्ये पाहायला मिळत आहे.

Shivani Surve and Ajinkya Nanaware Engagement Photos

साखरपुड्यासाठी अभिनेत्रीने फिकट जांभळ्या रंगाच्या साडीची निवड केली तर वेस्टर्न लुकवर तिने हिरव्या बांगड्यांचा चुडा घातला होता. तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, जॅकेट आणि त्यावर टोपी घातली होती. शिवानी आणि अजिंक्यने अचानक दिलेल्या या बातमीने सर्वांना सुखद धक्का बसला आहे. (Shivani Surve and Ajinkya Nanaware Engagement)

‘अशी’ आहे शिवानी-अजिंक्यची लव्हस्टोरी (Shivani Surve Ajinkya Nanaware Love Story)

शिवानी आणि अजिंक्य यांची पहिली भेट तू जीवाला गुंतवावे सिरीयलच्या सेटवर झाली होती. सेटवर दोघांमध्ये फक्त मैत्री होती. पण नंतर हळू हळू त्यांची मैत्री अजून घट्ट झाली आणि त्यांना दोघांमध्ये मैत्रीच्या पलीकडे असलायचे जाणवल. त्यानंतर ते नेहमी भेटू लागले. 2016 पासून दोघे एकमेकांना डेट करत होते. शिवानी आणि अजिंक्यच्या लग्नाला त्यांच्या घरच्यांकडून विरोध होता. पण नंतर सर्वकाही ठीक झाले. आता दोघांनी आपल्या नात्याला नाविन नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

अजिंक्य आणि शिवानी वर्कफ्रंट

दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर शिवानी नुकतेच झिम्मा 2 चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. चित्रपटामधील तिची मनालीची भूमिका दर्शकांना चांगलीच आवडली. शिवानी आता लवकरच जिलबी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये तिच्यासोबत स्वप्नील जोशी, प्रसाद ओक देखील मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर शिवानीचा होणारा नवरा अजिंक्य सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या सिरीयलमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर ‘या’ दिवशी अडकणार विवाह बंधनात, लग्नाची तारीख झाली लीक