Shoaib Malik Wedding: पाकिस्तानी क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शोएब मलिकने तिसरे लग्न (Shoaib Malik Wedding) केले आहे. हे लग्न अशावेळी झाले आहे जेव्हा त्याची पत्नी सानिया मिर्झापासून वेगळे होण्याच्या बातम्या येत होत्या. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदची जीवनसाथी म्हणून निवड केली असून एका समारंभात हे लग्न पार पडले. शोएब मलिकने स्वतः इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.
सनाचे देखील दुसरे लग्न
शोएबने ज्या सना जावेदसोबत लग्न (Shoaib Malik Wedding) केले आहे ती देखील घटस्फोटीत आहे. पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक सना जावेदने 2020 मध्ये उमैर जसवाल सोबत लग्न केले होते. पण लवकरच अशा बातम्या येऊ लागल्या कि या कपलमध्ये काही ठीक नाही. नंतर दोघांनी आपापल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एकमेकांचा फोटो डिलीट केले होते आणि नंतर बातमी आली कि दोघांचा घटस्फोट झाला. 28 वर्षीय सना जावेदने पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये कम केले आहे. ऐ मुश्त-ए-खाक़, डंक सहित ती इतर अनेक फेमस शो चा भाग राहिली आहे. शिवाय ती अनेक म्युझिक व्हिडीओ मध्ये देखील दिसली आहे.
सानियासोबत शोएबने केले होते दुसरे लग्न – Shoaib Malik Wedding
शोएबने सानियासोबत 2010 मध्ये लग्न (Shoaib Malik Wedding) केले होते. तेव्हा आयशा सिद्दीकीने समोर येऊन म्हंटले होते कि ती शोएबची पहिली पत्नी आहे आणि घटस्फोट न देता तो दुसरे लग्न करू शकत नाही. त्यावेळी शोएब ने आयशासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध नसल्याचे सांगितले होते. पण नंतर प्रकरण वाढल्यानंतर त्याने आयशासोबत घटस्फोट घेतला होता. शोएब ने सानियासोबत लग्न केल्यानंतर पहिली पत्नी आयशाला घटस्फोट दिला होता.
असे राहिले अंतरराष्ट्रीय करियर
तर शोएब मलिक च्या क्रिकेट करियरबद्दल बोलायचे झाले तर त्याने 287 एकदिवसीय सामन्यांमध्ये 258 डावांत 7534 धावा बनवल्या आहेत. ज्यामध्ये 9 शतके आणि 44 अर्धशतके सामील आहेत. तर टेस्ट क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर त्याने 35 टेस्ट सामन्यांमध्ये 1898 धावा बनवल्या आहेत ज्यामध्ये 3 शतक आणि 8 अर्धशतक आहेत. T20 सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर त्याने 124 सामन्यांमध्ये 2435 धावा केल्या ज्यात 75 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.
सानियाच्या पोस्टमुळे वाढल्या संभावना
बुधवारी सानिया मिर्झाने एक रहस्यमय पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे तिच्या आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या अफवा आणखीनच वाढल्या. सानियाने लिहिले कि, लग्न कठीण आहे. घटस्फोट घेणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा, लठ्ठपणा कठीण आहे. तंदुरुस्त राहणे कठीण आहे, कर्जामध्ये बुडणे कठीण आहे, संवाद न करणे कठीण आहे, आपले कठीण निवडा, आयुष्य कधी सोपे नसते. हे नेहमी कठीण राहील. पण आपण आपली मेहनत निवडू शकतो. सानियाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर जो कोट शेयर केला होता त्यामध्ये लिहिले होते कि हुशारीने निवडा.
या संभावनांना आणखीनच बळ मिळेल जेव्हा सानिया मिर्झाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शोएब मलिकसोबतचा आपला नुकतेच शेयर केलेला एक फोटो डिलीट केला होता. 8 जानेवारी रोजी तिने एक पोस्ट शेयर करत लिहिले होते कि, जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या हृदयाची शांती भंग करते, तेव्हा ती जाऊ द्या.”
हेही वाचा: विवाहबंधनात अडकला मुकेश कुमार, फोटोज आणि व्हिडीओ व्हायरल