Mukesh Kumar Marriage: विवाहबंधनात अडकला मुकेश कुमार, फोटोज आणि व्हिडीओ व्हायरल

Mukesh Kumar Marriage: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार विवाहबंधनात अडकला आहे. मुकेशने मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी २० मधून लग्नासाठी सुट्टी घेतली होती. आता तो विवाहबंधनात अडकला आहे. भारतीय पेसरच्या लग्नाचं पहिला फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मुकेश आणि त्याची पत्नी या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.

Mukesh Kumar Marriage पहिला फोटो

Mukesh Kumar

आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ने मुकेश कुमारचे अभिनंदन करताना त्याच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. मुकेशच्या पत्नीचे नाव दिव्या आहे. मुकेशचे लग्न गोपालगंज येथील गोरखपूरमध्ये झाले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मुकेश कुमार वराच्या रुपात निघताना दिसत आहे. यावेळी त्याने शेरवानी परिधान केली आहे.

मुकेश कुमार (Mukesh Kumar) ऑस्ट्रेालियाविरुद्ध खेळल्याय जाणा-या पाच सामन्याच्यार टी-२० मालिकेत खेळत आहे. त्याने लग्नासाठी बीसीसीआयकडे रजा मागितली होती. याआधी खेळल्या गेलेल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये तो प्लेईंग इलेवनचा भाग होता. मुकेश कुमारच्या जागी आवेश खानला खेळवण्यात आले. राह्पूर येथे खेळल्या जाणार्या चौथ्या टी-२० मध्ये मुकेश टीम इंडियामध्ये सामील होणार आहे.

अशी आहे Mukesh Kumar ची आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकीर्द

मुकेशने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. २०२३ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने १ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २, एकदिवसीय सामन्यात ४ आणि T२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने १० आयपीएल सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने ४६.५७ च्या सरासरीने ७ विकेट घेतल्या आहेत. मुकेशने २०२३ मध्येच आयपीएलमध्ये (IPL) पदार्पण केले.

हेही वाचा
==> Rahul Dravid ला किती मिळणार सॅलरी, टीम इंडियाच्या हेड कोचचा किती असेल कार्यकाळ?

Leave a comment