अभिनेत्री श्रुती मराठेचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली; ‘आयुष्य पूर्ण करण्यासाठी पुरुषाची…’

राधा हि बावरी सिरीयलमधून घराघरामध्ये फेमस झालेली अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marrathe) तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेमध्ये राहते. अभिनेत्रीने चित्रपटासोबतच सिरीयल, वेब सिरीज अशा क्षेत्रामध्ये देखील आपले नशीब आजमावले आहे. त्याचबरोबर मराठी व्यतिरिक्त तमिळ, तेलगु आणि हिंदी भाषांमध्ये देखील तिने कम केलं आहे.

श्रुती मराठे (Shruti Marrathe) चं वक्तव्य

अभिनयासोबत आता श्रुतीने निर्मिती क्षेत्रामध्ये देखील पदार्पण केले आहे. नुकतेच बंद झालेली ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेची निर्मिती श्रुतीने केली होती. हि मालिका खूपच गाजली होती. अशामध्ये आता अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marrathe) तिच्या वक्तव्यामुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. ‘आयुष्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुरुषाची गरज नसते’ असं वक्तव्य तिने केलं आहे.

‘आरपार’ या युट्यूब चॅनेलच्या ‘वूमन की बात’ या शोमध्ये अभिनेत्री श्रुती मराठे सामील झाली होती. तेव्हा तिला प्रश्न विचारला गेला कि, खऱ्या आयुष्यामध्ये स्त्री म्हणून श्रुतीला काय वाटतं, एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये पुरुषाच्या येण्याने तिचा आयुष्य कलरफुल होईल? यावर उत्तर देताना श्रुती म्हणाली कि मला वैयक्तिक असं काही वाटत नाही, तो कोणत्या उद्देशाने तुमच्या लाईफमध्ये येतो हे क्लिअर असायला लागतं.

श्रुती पुढे म्हणाली कि, आयुष्याचं छान वर्तुळ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुरुषाची गरज नसते. मला तर एका पुरुषाची गरज भासली किंवा मला लग्न करावेसे वाटले तर मला एक सोबती म्हणून हवा आहे, मला त्याची गरज आहे किंवा त्यानं माझं आयुष्य पूर्ण कराव म्हणून नको.

श्रुती मराठे बद्दल बोलायचे झाले तर तिने ‘राधा ही बावरी’ व्यतिरिक्त जागो मोहन प्यारे या मालिकेमध्ये देखील काम केल आहे. त्याचबरोबर सनई चौघडे, सरसेनापती हंबीरराव, शुभ लग्न सावधान सारख्या चित्रपटामध्ये देखील ती मुख्य भूमिकेत दिसली आहे. शिवाय श्रुती इमरान हाशमीच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ सीरिजमध्ये देखील दिसली होती.

हेही वाचा: ‘भागो मोहन प्यारे’ फेम अभिनेत्रीने दिली चाहत्यांना ‘गुड न्यूज’, नवीन वर्षाच्या दिवशी झालं गोंडस पाहुण्याचं आगमन