अमिताभ बच्चनची हि अभिनेत्री मृत्यूच्या वेळी होती प्रेग्नेंट Soundarya Death, अंतिम संस्कारासाठी मिळाला नव्हता मृतदेह !

Soundarya Death She Was Pregnant: १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा सूर्यवंशम हा चित्रपट फ्लॉप झाला होता. परंतु हा चित्रपट आजही सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. हा चित्रपट दर दोन-तीन दिवसांनंतर सोनी मॅक्सवर प्रदर्शित केला जातो.

अमिताभ बच्चनच्या शिवाय या चित्रपटामध्ये फेमस अभिनेत्री सौंदर्या (Soundarya) रघुसुद्धा मुख्य भूमिकेमध्ये होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अवघ्या ५ वर्षातच सौंदर्या रघुचे निधन झाले. जेव्हा सौंदर्या रघुचे निधन झाले होते त्यावेळी ती प्रेग्नेंट होती. तिच्या कुटुंबाला तिची डेट बॉडीसुद्धा मिळाली नव्हती.

Soundarya Death She Was Pregnant

Soundarya

हि गोष्ट २००४ सालातील आहे. सौंदर्या Soundarya बीजेपी आणि तेलुगू देशम पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी करीमनगरला जात होती. सौंदर्या ज्या चार आसनी खासगी विमानाने जात होती त्या विमाने ११.०५ ला बेंगळुरूमधील जक्कूर एअरफील्डवरून उड्डाण घेतले होते. १०० फूट वर गेल्यानंतरच एयरक्राफ्ट क्रँश झाले.

त्या एयरक्राफ्टमध्ये तिच्यासोबत तिचे भाऊ अमरनाथ, हिंदू जागरण समितिचे सेक्रेटरी रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप होते.या घटनेमध्ये चारही जणांचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी सौंदर्या रघु चा मृत्यू झाला त्यावेळी ती ३१ वर्षांची होती. तिचे खरे नाव सौम्या सत्यनारायण असे होते. १८ जुलै १९७२ रोजी कर्नाटकमधील कोलार मध्ये सौंदर्या रघुचा जन्म झाला होता. तिचे वडील हे इंडस्ट्रियलिस्ट आणि कन्नड़ चित्रपटांचे लेखक होते ज्यांचे नाव होते के. एस. नारायण.

Soundarya Death

मृत्यूच्या १ वर्षाआधी म्हणजेच २००३ मध्ये त्यांचे लग्न सॉफ्टवेयर इंजीनियर जी. एस. रघु सोबत झाले होते. बातमीनुसार २०१० मध्ये जी. एस. रघुने अर्पितासोबत दुसरे लग्न केले. १९९८ मध्ये जेव्हा सौंदर्याला एक प्रश्न विचारला गेला होता त्यावेळी रघुने सांगितले होते कि, चित्रपट तिच्या मनामध्ये शेवटची गोष्ट आहे. माझे वडील फिल्ममेकर होते. मी त्यांच्यासोबत फिल्म सेटवर नेहमी जात असे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

हेही वाचा
==> शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षीचा Sonakshi Sinha Looks चेहरा का दिसतो हुबेहूब रीना रॉय सारखा जाणून घ्या !

Leave a comment