कपाळी टिळा, गळ्यामध्ये फुलांची माळ… तमन्ना भाटियाने सहकुटुंब घेतले कामाख्या देवीचे दर्शन, पहा फोटोज

Tamannaah Bhatia Visit to Kamakhya Temple: साऊथ पासून ते बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारी सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही सुंदर फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या कुटुंबासोबत पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो आसाम, गुवाहाटी येथील आहेत. जिथे ती कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. चाहत्यांना तिचे हे फोटो खूप पसंद येत आहेत.

Tamannaah Bhatia Visit to Kamakhya Temple

तमन्ना ने शेयर केले फोटो – Tamannaah Bhatia Visit to Kamakhya Temple

तमन्ना भाटियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जे फोटो शेयर केले आहेत त्यामध्ये ती रंगाचा सूट घातलेली दिसत आहे ज्यावर तिने लाल रंगाची चुनरी घेतली आहे. यासोबत तिने कपाळी टिळा आणि गळ्यामध्ये फुलांची माळ देखील घातली आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच आनंदी दिसत आहे.

वास्तविक अभिनेत्री नुकतेच आसाममधील गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये (Tamannaah Bhatia Visit to Kamakhya Temple) पोहोचली आहे. यावेळी ती हातामध्ये लाल टोपली घेऊन मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेली पाहायला मिळाली. अभिनेत्रीच्या या साधेपणाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तर एका फोटोमध्ये तमन्ना भाटिया तिच्या आईसोबत पाहायला मिळत आहे. ती कामाख्या देवीच्या समोर उभी आहे. यासोबत ती तिच्या तिच्या वडिलांसोबत देखील पाहायला मिळत आहे.

Tamannaah Bhatia Visit to Kamakhya Temple

आणखी एका फोटोमध्ये तमन्ना भाटिया कामाख्या देवीच्या समोर दिवा लावताना दिसत आहे. यादरम्यान तिने गळ्यामध्ये लाल रंगाची चुनरी देखील घातली आहे. फोटोमध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया कामाख्या देवीच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली पाहायला मिळत आहे.

तर शेवटच्या फोटोमध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहे. ज्यामध्ये तिचे आईवडील आणि कुटुंबातील इतर सदस्य पाहायला मिळत आहेत. फोटोसाठी पोज देताना देखील दिसत आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्टपणे पाहायला मिळताहेत. तमन्नाने शेयर केले फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा: राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा, आता अयोध्यामध्ये करणार लग्न, आहे प्रभू श्री रामाचा भक्त