Premachi Goshta आता फुलणार, सागर मुक्तासाठी बनवणार खास पदार्थ

Premachi Goshta serial ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील स्वाती व तिचा नवरा कार्तिकवर ओढावलेलं संकट अखेर दूर झालं आहे. सगळ्यांच्या नकळत मुक्ता स्वातीला करत असलेली मदत कोळी, गोखले कुटुंबासमोर येते. यामुळे सागरही मुक्ताला घराबाहेर काढण्यापासून इंद्राला रोखतो. पण खऱ्या अर्थाने सागरचे डोळे उघडतात. मुक्ताने कोळी कुटुंबाची लाज राखण्यासाठी जे काही केलंय त्यासाठी तो तिचे आभार मानतो. या सगळ्या नाट्यानंतर सागर मुक्तासाठी एक खास पदार्थ बनवताना दिसणार आहे.

प्रेमाची गोष्ट’च्या आजच्या भागात सागरचे वडील बापू झालेल्या सगळ्या घटनेमुळे मुक्ताला सोन्याची चैन काढून बक्षीस स्वरुपात देतात. पण मुक्ता घेण्यास नकार देते. मात्र बापू त्यांच्या आईने दिलेली चैन आशीर्वाद म्हणून तिला देतात. यावेळी इंद्रा बापूंना थांबवते. पण नंतर सागर घे म्हटल्यावर मुक्ता बापूंनी दिलेली चैन स्वीकारते. Read More…

Premachi Goshta प्रेमाची गोष्ट

Web Title -tejashri pradhan premachi goshta serial