16GB पर्यंत रॅम आणि 100x झूमसह लाँच झाला Vivo X100 Pro, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo X100 Pro स्मार्टफोन लाँच झाला आहे. यामध्ये MediaTek Dimensity 9300 SoC प्रोसेसर, Android 14 वर आधारित OriginOS 4, 120Hz रिफ्रेश रेटसह Zeiss-ब्रँडेड ट्रिपल रिअर कॅमेरा यांसारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये 100W चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग दरासह 5400mAh बॅटरी आहे. Vivo X100 Pro ची किंमत, उपलब्धता आणि फीचर्स येथे जाणून घ्या.

Vivo X100 Pro प्राईस

Vivo X100 Pro च्या 12 GB RAM आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत अंदाजे 56,500 रुपये आहे. त्याचबरोबर 16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत अंदाजे 60,000 रुपये आहे. शिवाय 16 GB रॅम आणि 512 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत अंदाजे 62,000 रुपये आहे. तर 16 GB RAM आणि 1 TB स्टोरेज वेरिएंटची किंमत अंदाजे 68,000 रुपये आहे.

Vivo X100 Pro

या फोनची सिरीज ब्लॅक, स्टार ट्रेल ब्लू, सनसेट ऑरेंज आणि व्हाईट मूनलाइट कलरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा फोन चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर डिलिव्हरी 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा फोन भारतात कधी लाँच होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

Vivo X100 Pro फीचर्स

हा फोन ड्युअल सिमवर काम करते.यामध्ये Android 14 वर आधारित OriginOS 4 आहे. 6.78 इंच (1260 x 2800 पिक्सेल) AMOLED 8T LTPO वक्र डिस्प्ले आहे. यामध्ये 3000 निट्स ची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. हा फोन ऑक्टा-कोर 4nm मीडियाटेक डाइमेंसिटी 9300 SoC ने सुसज्ज आहे. यामध्ये 16 GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. तर 1 TB पर्यंत स्टोरेज आहे.

Vivo X100 Pro

फोनमध्ये Zeiss ब्रँडचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) सपोर्टसह 50-मेगापिक्सलचा Sony IMX989 1-इंच टाईप सेंसर, 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल Zeiss APO सुपर-टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. यात 100x डिजिटल झूम सपोर्ट आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Vivo X100 Pro मध्ये कनेक्टिविटी साठी 5G, Wi-Fi 7, Bluetooth, NFC, GPS, NavIC, OTG आणि USB Type-C पोर्ट देण्यात आली आहे. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. फेस अनलॉक देखील देण्यात आला आहे. यासोबत डस्ट आणि वॉटर रेस्सिटेंट साठी IP68 रेटिंग दिली गेली आहे. फोनमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट वाली 5400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

हेही वाचा: iPhone 16 Pro Release Date: इतक्या धमाकेदार लुकमध्ये मार्केटमध्ये एंट्री करणार iPhone 16 Pro, जाणून घ्या कधी होणार लाँच