Salaar Box Office Collection Day 8: बॉक्स ऑफीसवर ‘सालार’ चा जलवा, प्रभासच्या चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई

Salaar Box Office Collection Day 8: प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांची जुगलबंदी बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. चित्रपट रिलीज होऊन आठ दिवस झाले आहेत आणि कमाईचा वेग अजून झपाट्याने वाढत आहे. चित्रपट रिलीज होऊन आठवड्यापेक्षा एक दिवस झाला आहे. यावरून हा अंदाज लावणे सोपे आहे कि चित्रपट चाहत्यांना चांगलाच आवडला आहे, जसा बाहुबली आवडला होता. चला तर जाणून घेऊया पहिल्या दिवसानंतर आता आठव्या दिवशी सालारची कमाई (Salaar Box Office Collection Day 8) कशी राहिली.

सालारची आठव्या दिवसाची कमाई (Salaar Box Office Collection Day 8)

बाहुबली प्रभासचा सालार चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तथापि विकेंड होताच सालारच्या कमाईचा वेग थोडा कमी झाला होता. पण नंतर ती अजून वाढली. कमाईचा वेग अशाप्रकारे वाढत आहे कि चित्रपटाने आठव्या दिवशी देखील 19 करोडची कमाई कली आहे. असा अंदाज लावला जात आहे कि चित्रपट अशा वेगाने कमाई करत राहील. पहिल्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने 90 करोडचा गल्ला जमवला होता आणि बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली होती.

साऊथ इंडियामध्ये संथ गतीने कमाई (Salaar Collection In South)

सालारची कमाई हिन्दी बॉक्स ऑफिसवर वेगाने जारी आहे. जगभरामध्ये सालार चित्रपटाला खूपच पसंद केले जात आहे. पण साऊथच्याच प्रदेशामध्ये चित्रपटाचा प्रभाव जास्त पाहायला मिळत नाही आहे. खासकरून आंध्र प्रदेश सोडून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये चित्रपटाला खास प्रतिसाद मिळत नाही आहे. असे असून देखील पॅन इंडिया मूवीच्या इतर व्हर्जनला चाहते खूप पसंद करत आहेत. हेच कारण आहे कि चित्रपटाचा बिजनेस योग्य स्पीडने पुढे जात आहे. चित्रपटाने आतापर्यंत जगभरामध्ये 500 करोडपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर भारतामध्ये चित्रपटाने 300 करोडचा आकडा पार केला आहे.

हेही वाचा: Salaar Box Office Collection Day 3 : बॉक्स ऑफिसवर ‘सालार’ चे वादळ, तीन दिवसात कमवले तब्बल इतके करोड