BharatGPT: ChatGPT ला टक्कर देण्यासाठी येत आहे BharatGPT, मुकेश अम्बानी लाँच करणार BharatGPT, जाणून घ्या संपूर्ण माहिती

BharatGPT: सध्याच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीने खूप पुढे निघून गेली आहे, हेच कारण आहे कि जगात अनेक प्रकारचे AI म्हणजेच Artificial Intelligence टूल पाहायला मिळत आहेत. अशा AI टूल्सद्वारे आपण अनेक कामे चुटकीसरशी करू शकतो. तुम्ही इंटरनेटवर ChatGPT AI टूल बद्दल कधीना कधी ऐकलेच असेल. ChatGPT एक असे Artificial Intelligence आहे ज्याला तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता. हे AI आपल्या प्रश्नाचे उत्तर काही सेकंदामध्ये देते. शिवाय ChatGPT वर आपण अनेक प्रकारच्या गोष्टी करू शकतो.

BharatGPT

तरीही ChatGPT काही गोष्टीमध्ये अजून मागे आहे, जसे इतर भाषांमध्ये काम करणे इत्यादी. यामुळे आता भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अम्बानी या AI च्या जगतामध्ये पाऊल ठेवत आहेत. जेणेकरून AI च्या जगतामध्ये अनेक गोष्टी घेऊन येत येईल. मुकेश अम्बानी यांची Jio कंपनी लवकरच भारतातील पहिले AI टूल BharatGPT घेऊन येत आहे.

काय आहे BharatGPT?

BharatGPT एक मल्टीलॅंग्वेज AI मॉडेल आहे ज्याला तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये प्रश्न विचारू शकता. शिवाय तुम्ही Bharat GPT द्वारे कोडिंग, कंटेंट रायटिंग, मॅथ चे प्रश्न इत्यादी देखील करून घेऊ शकता. सध्या Bharat GPT वर काम सुरु आहे आणि यावर Reliance Jio काम करत आहे.

नुकतेच Reliance Jio कंपनीचे चेयरमन आकाश अम्बानीने दरवर्षी होणाऱ्या TechFest मध्ये Bharat GPT बद्दल माहिती शेयर केली आहे. TechFest मध्ये आकाश अम्बानीने Bharat GPT ची घोषणा करताना म्हंटले कि, आम्ही लोक लँग्वेज मॉडल्स आणि जेनरेटिव AI च्या मदतीने नवीन सुरुवात करणार आहोत.

IIT Bombay सोबत मिळून बनवत आहेत BharatGPT

Reliance Jio चे चेयरपर्सन आकाश अम्बानी ने हे देखील सांगितले कि त्यांची कंपनी Bharat GPT बनवण्यासाठी 2014 पासून काम करत आहे आणि यामध्ये त्यांच्यासोबत पार्टनरशिप मध्ये IIT Bombay देखील काम करत आहे, जेणेकरून रिलायंस भारतीयांसाठी देशाने पहिले AI टूल बनवू शकतील. शिवाय आकाश अम्बानीने हे देखील सांगितले कि भारताच्या प्रत्येक कंपनीमध्ये या टूल चा वापर बिजनेससाठी केला जाईल आणि Reliance Jio आगामी काळामध्ये जे प्रोडक्ट्स घेऊन येणार आहे त्यामध्ये देखील AI चा वापर करण्याचे ऑप्शन दिले जातील.

या दिवशी लाँच होणार BharatGPT (BharatGPT Launch Date)

BharatGPT च्या Launch Date बद्दल बोलायचे झाले तर याबद्दल कोणती माहिती समोर आलेली नाही. आकाश अंबानी यांनी देखील याबद्दल कोणतीही माहिती शेयर केलेली नाही. मिडिया रिपोर्ट्सनुसार Bharat GPT पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत लाँच होऊ शकते. त्याचबरोबर Bharat GPT लाँच झाल्यानंतर ChatGPT चे मार्केट खूपच खाली येऊ शकते कारण Bharat GPT मध्ये अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळतील.