Professional Tax म्हणजे काय, कधी आणि कोणी करावा जमा, जाणून घ्या महत्वाची माहिती

Professional Tax किंवा व्यावसायिक करत तो असतो जो एका मर्यादेपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या लोकांनी भरावा लागतो. हा कर राज्य सरकार लावते. यामुळे तो Income Tax पेक्षा वेगळा असतो. तथापि तुम्ही आयटीआरमध्ये एका आर्थिक वर्षात भरलेल्या Professional Tax वर सूट प्राप्त करू शकता.

कोणत्या लोकांना जमा करावा लागतो Professional Tax

व्यावसायिक कर कर्मचारी, व्यावसायिक, फ्रीलांस, डॉक्टर आणि इतर व्यवसायांमध्ये एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त कमावणाऱ्या लोकांना भरावा लागतो. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 276 अन्वये राज्यांना व्यवसाय, व्यापार आणि रोजगाराशी संबंधित कायदे बनवण्याचा अधिकार आहे. सर्व राज्यांमध्ये व्यावसायिक कर लादला जात नाही.

Professional Tax

Professional Tax रेट

हा कर राज्यांकडून लावला जात असल्यामुळे प्रत्येक राज्याचा याचा रेट वेगवेगळा असतो. अनुच्छेद 276 नुसार, कोणत्याही स्थितीमध्ये हा 2,500 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. तर राज्यांबद्दल बोलायचे झाले तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगाना आणि केरळमध्ये Professional Tax वसूल केला जातो.

व्यावसायिक कर कोणाला भरावा लागतो?

जर तुम्ही कर्मचारी असाल आणि अशा राज्यामध्ये काम करता जिथे व्यावसायिक कर आकारला जातो, तेव्हा तुमच्या पगारामधून व्यावसायिक कर कापून घेतला जातो. जर तुम्ही फ्रीलांसिंग करत असाल तर तुम्हाला राज्याच्या ऑथोरिटीजवळ नोंदणी करावी लागेल आणि जर एका मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास कर भरावा लागेल. राज्य सरकारच्या व्यावसायिक कर विभागाकडून व्यावसायिक कर गोळा केला जातो. राज्य कर असल्याने, त्याची प्रक्रिया प्रत्येक राज्यात वेगळी असते आणि तुम्ही तो ऑफलाइन आणि ऑनलाइन जमा करू शकता.

Leave a comment