गॅस सिलिंडर बुकिंगचं टेंशन संपलं! आता व्हॉट्सअ‍ॅपवरून करा गॅस बुकिंग, जाणून घ्या सोपी पद्धत

WhatsApp Gas Cylinder Booking: बुकिंग करण्याच्या अगोदर घरातील गॅस सिलिंडर संपला आहे का? तुम्हाला देखील काही दिवस शेजारच्यांना सिलिंडर मागावे लागते का? किंवा बाहेरचे जेवण ऑर्डर करावे लागते का किंवा सिलिंडर येईपर्यंत चुलीवर स्वयंपाक करावा लागतो का? तर आता या झंझटमध्ये पडण्याची गर नाही कारण गॅस संपल्यावर अवघ्या काही मिनिटांमध्ये गॅस सिलिंडर (WhatsApp Gas Cylinder Booking) तुमच्या दारात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने फक्त 15 मिनिटांमध्ये गॅस सिलिंडर तुमच्या दारात येणार येऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांमध्ये गॅस बुक करू शकता. जगभरामध्ये मॅसेंजिंग अ‍ॅप म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कॅब बुकिंग, मेट्रो तिकीट, ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन शॉपिंग इत्याधी सुविधांचा लाभ घेऊ शकता. आता गॅस सिलिंडर बुकिंग (Gas Cylinder Booking via WhatsApp Process in Marathi) देखील तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने करू शकणार आहात. फक्त यासाठी काही स्टेप्स फोलो करावे लागतील.

व्हॉट्सअ‍ॅपवरून असे कराल गॅस सिलिंडर बुकिंग (WhatsApp Gas Cylinder Booking)

व्हॉट्सअ‍ॅपवरून गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी तुम्हाला आपल्या फोनमध्ये डिस्ट्रीब्यूटर कंपनीचा नंबर सेव करावा लागेल. यानंतर तुम्हाला गॅस सिलिंडर देणाऱ्या कंपनीचा नंबर सेव करावा लागेल. ज्यानंतर काही मिनिटांमध्ये गॅस सिलिंडर तुमचा घरी पोहोचवला जाईल.

  • गॅस बुकिंग नंबर कोणता आहे?
  • इंडियन व्हॉट्सअ‍ॅप नंबर-7588888824
  • एचपी व्हॉट्सअ‍ॅप नंबर- 9222201122
  • भारत गॅस -1800224344

वर दिलेल्या डिस्ट्रीब्यूटर कंपनीकडून जर तुम्हाला गॅस येत असेल तर हे नंबर तुमच्या फोनमध्ये सेव करून घ्या. यानंतर काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहजपणे गॅस सिलिंडर बुकिंग करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव केल्यानंतर गॅस सिलिंडर बुकिंग कसे करायचे?

जर तुम्ही फोनमध्ये गॅस डिस्ट्रीब्यूटर कंपनीचा नंबर सेव केला असेल तर गॅस डिस्ट्रीब्यूटर कंपनीच्या नंबरवर “Hi” असा मॅसेज करा. यानंतर तुम्हाला अनेक ऑप्शन पाहायला मिळतील. यामधील एक ऑप्शन बुकिंगचा देखील असेल. गॅस सिलिंडर बुकिंग सिलेक्ट केल्यानंतर काही वेळामध्येच तुमच्या पत्त्यावर गॅस सिलिंडर पोहोचवला जाईल.