Yami Gautam Pregnant: लग्नाच्या 3 वर्षानंतर आई होणार यामी गौतम? बेबी बंप लपवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Yami Gautam Pregnant: यामी गौतम बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने वेळोवेळी आपल्या चाहत्यांना आपली अभिनयाची प्रतिभा आणि बोल्ड स्टाईला प्रभवित केले आहे. यामी तिच्या बेधडक वक्तव्यामुळे देखील चर्चेमध्ये राहते. आपल्या शानदार करियरशिवाय अभिनेत्री तिचा पती आदित्य धर सोबत एक शांतीपूर्ण आयुष्य जगत आहे. दोघांनी 2021 मध्ये आपल्या कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले होते आणि तेव्हापासून दोघांनी त्यांचे पर्सनल लाईफ गुप्त ठेवले आहे.

यामी गौतमचा व्हिडीओ व्हायरल (Yami Gautam Pregnant)

यामी गौतम क्वचितच पाहायला मिळत असते. अभिनेत्री नुकतेच तिचा पती आदित्य धरसोबत स्पॉट झाली. दोघेहि एथनिक आउटफिट मध्ये खूपच सुंदर दिसत होते. यामीने गुलाबी रंगाचा सलवार सूट घातला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती अभिनेत्रीने आपल्या लुकला व्हाइट फ्लॅट्स आणि सनग्लासेससह पूर्ण केले होते. तिचा पती आदित्यने निळ्या रंगाच्या नेहरू जॅकेटसह पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातला होता.

यादरम्यान सर्वांचे लक्ष यामी गौतमने वेधून घेतले. कारण अभिनेत्री ज्याप्रकारे आपले पोट दुपट्ट्याने लपवत होती यावरून असे वाटते आहे कि ती प्रेग्नंट आहे. अभिनेत्रीने आपली पर्स आणि दुपट्टा चारी बाजूला गुंडाळला होता. यावरून असे वाटत आहे कि ती आपले बेबी बंप (Yami Gautam Pregnant) लपवण्याच्या प्रयत्न करत आहे. शिवाय तिच्या तिच्या चेहऱ्यावर एक चमक होती. यावरून चाहते असा अंदाज लावत आहे कि अभिनेत्री लवकरच गुड न्यूज देणार आहे.

नेटिझन्सनी दिल्या प्रतिक्रिया

नेटिझन्स असा अंदाज लावत आहे कि यामी गौतम लवकरच चाहत्यांना गुड न्यूज देणार आहे. यामीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच नेटिझन्सनी तिच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने असे देखील म्हंटले कि यामीने ज्याप्रकारे दुपट्टा पकडला आहे. त्यावरून ती प्रेग्नंट आहे. तर काहींनी कपलला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांनंतर परिणीती चोप्राने दिली गुडन्यूज, म्हणाली; ‘मी आता लवकरच…’