12th Fail OTT Release: विक्रांत मेसीचा चित्रपट ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज, जाणून घ्या डेट आणि टाईम

12th Fail OTT Release: या वर्षी एनिमल, जवान, गदर 2 सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. पण यामध्ये एका कमी बजटच्या चित्रपटाने देखील कमाल केली आहे. चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमीच केली नाही तर दर्शकांचे मन देखील जिंकले आहे. या चित्रपटाचे नाव 12th Fail आहे. 12th Fail चित्रपटामध्ये अभिनेता विक्रांत मेसीने मुख्य भूमिका केली आहे. चित्रपट विधु विनोद चोपड़ा यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाला दर्शकांनी खूपच पसंद केले. आता चित्रपटाच्या ओटीटी रिलीज (12th Fail OTT Release) बद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

12th Fail OTT Release – या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

12th Fail ओटीटी वर 29 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होत आहे. हा चित्रपट दर्शक डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकतात. OTT प्लॅटफॉर्मने 12th Fail OTT Release च्या डिजिटल प्रीमियर संदर्भात अधिकृत पोस्ट देखील केली आहे. दर्शक आता घरबसल्या विक्रांत मेसीच्या अभिनयाचा आणि विधू विनोद चोप्राच्या जबरदस्त दिग्दर्शनाचा आनंद घेऊ शकतात. विधु विनोद चोपड़ा दिग्दर्शित 12th Fail चित्रपट क्रिटिकली आणि कमर्शियली यशस्वी राहिला आहे. विक्रांतने नुकतेच पुष्टी केली आहे कि या चित्रपटाला ऑस्कर 2024 पाठवले गेले आहे. गेल्या महिन्यामध्ये हे सांगितले होते कि विधु विनोद चोपड़ाचा ड्रामा चित्रपट 12th Fail 2024 मध्ये ऑस्करसाठी पुढे जात आहे.

ऑस्करसाठी नामांकन

मुलाखतीदरम्यान विक्रांत मेसीने खुलासा केला कि हा चित्रपट 2024 मध्ये स्वतंत्र नामांकन म्हणून ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचं इवेंटमध्ये विक्रांतने खुलासा केला कि त्याने आपल्या अभिनयाची जर्नी तेव्हा सुरुवात केली जेव्हा तो फक्त 15 वर्षाचा होता. विक्रांतने आपल्या करियरची सुरुवात टीव्हीवरून केली नी नंतर त्याने सफलरित्या चित्रपटांमध्ये पदार्पण केले.

नुकतेच विक्रांतने आपल्या इंस्टाग्रामवरून आईपीएस मनोज शर्मा यांच्याबदल लिहिले. हे तेच व्यक्ती आहेत ज्यांच्यावर 12th Fail मध्ये त्याची भूमिका बेस्ड होती. त्याने लिहिले, खूपच कमी लोक असे भेटतात जे आपले मत कायम ठेवतात. असे लोक विजय किंवा अपयशाची पर्वा न करता आपले पाय जमिनीवर घट्ट ठेवतात. त्यांची मान ताठ असते आणि त्यांचे मन योग्य ठिकाणी असते

विक्रांतने पुढे लिहिले आहे कि, मी खूपच लकी आहे कि मला तुम्हाला भेटता आले. तुमचे काम आणि या जगाला एक चांगले स्थान बनवण्याचा तुमचा दृढ संकल्प शब्दांच्या पलीकडे आहे. मला अशा आहे कि माझा देखील तुम्हाला एक दिवस अभिमान वाटेल. विधु विनोद चोपड़ा लिखित आणि दिग्दर्शित, 12th Fail चित्रपट अनुराग पाठक यांच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. यामध्ये विक्रांत, मेधा शंकर, अनंत वी जोशी, अंशुमान पुष्कर आणि प्रियांशु चटर्जी आहेत. 12th Fail चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला होता.

Also Read: विक्की कौशलचा ‘सॅम बहादुर’ ओटीटीवर रिलीज करण्याची तयारी, या दिवशी होणार रिलीज

Leave a comment