Sam Bahadur OTT Release: विक्की कौशलचा ‘सॅम बहादुर’ ओटीटीवर रिलीज करण्याची तयारी, या दिवशी होणार रिलीज

Sam Bahadur OTT Release: विक्की कौशलचा ‘सॅम बहादुर’ चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. बॉक्स ऑफिसवर याचा सामना रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासोबत सुरु आहे. पहिल्या आठवड्यामध्ये ‘सॅम बहादुर’ चित्रपटाने 38.80 करोडचे कलेक्शन केले, तर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये काही शंका नाही कि ‘अ‍ॅनिमल’ च्या बंपर कमाईमुळे ‘सॅम बहादुर’ ला चांगलेच नुकसान झाले आहे, पण असे असून देखील याचे कलेक्शन संथ गतीने सुरु आहे. आता एक नवीन माहिती समोर आली आहे कि चित्रपट ओटीटीवर रिलीज (Sam Bahadur OTT Release) करण्याची तयारी सुरु झाली आहे.

Sam Bahadur OTT Release

मेकर्स ‘सॅम बहादुर’ च्या डिजिटल प्रीमियरसाठी तयारीला लागले आहेत. एका नवीन नियमाच्या आधारावर चित्रपटगृहांमध्ये रिलीज नंतर कोणत्याही चित्रपट ओटीटीवर (OTT) रिलीज करण्यासाठी 8 आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागते. तथापि अनेक प्रसंगी असे झाले नाही. ताजी माहिती हे सांगते कि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादुर’ पुढील वर्षी प्रजासत्ताक दिन 2024 च्या मुहूर्तावर ओटीटीवर रिलीज करण्यात येईल.

Sam Bahadur OTT Release – 55 करोड आहे ‘सॅम बहादुर’ चे बजेट

देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये विक्की कौशलसोबत सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख देखील आहेत. चित्रपटामधील विक्की कौशल अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. तथापि स्क्रीनप्लेच्या बाबतीत हा चित्रपट मागे पडला आहे. चित्रपटामध्ये सॅम मानेकशॉच्या बालपणापासून ते वृद्धापकाळापर्यंतचे जीवन दाखवण्यात आले आहे. फातिमा सना शेखने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 55 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

Sam Bahadur OTT Release

Sam Bahadur OTT Release – Zee5 वर रिलीज होईल सॅम बहादुर

तथापि आधिकारिकरित्या चित्रपटाच्या ओटीटीवर रिलीजबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण अशी चर्चा आहे कि Zee5 वर हा चित्रपट रिलीज केला जाईल. बॉक्स ऑफिसवरून अधिक कमाई करण्याचा मेकर्सचा प्रत्यन आहे. विशेष म्हणजे 21 डिसेंबरला डंकी आणि 22 डिसेंबरला सालारच्या रिलीजच्या अगोदर कोणताही मोठा चित्रपट नाही. अशामध्ये सॅम बहादुर चित्रपटाने आपल्या कमाईची स्पीड कायम ठेवल्यास 55 करोडच्या आसपास कमाई करू शकतो.

Also Read: विक्रांत मेसीचा चित्रपट ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज, जाणून घ्या डेट आणि टाईम

Leave a comment