Akshay Kumar Cricket Team: शाहरुख खान आणि प्रीती झिंटानंतर आता अक्षय कुमार बनला क्रिकेट टीमचा मालक

Akshay Kumar Cricket Team: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार बॉलीवूडमधील सर्वात फेमस अभिनेत्यांपैकी एक आहे. भले हि अभिनेता बॉक्स ऑफिसवर सध्या फारशी कमाल दाखवत नसेल पण चाहते आज देखील त्याच्यावर तितकेच प्रेम करतात. आपल्या बॉलीवूड करियर व्यतिरिक्त अक्षय कुमार आता एक नवीन सुरुवात करणार आहे.

Akshay Kumar Cricket Team

2023 राहिले नाही लकी

2023 मध्ये अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे कमाल दाखवू शकले नाहीत. 2023 मध्ये त्याचे सेल्फी, ओएमजी 2 आणि मिशन रानीगंज रिलीज झाले होते. मेकर्सना चित्रपटांकडून खूपच अपेक्षा होत्या पण चित्रपट पाहून दर्शक खूपच निराश झाले. चित्रपटाचे कंटेंट तर ठीक होते पण बॉक्स ऑफिसवर दर्शकांना इम्प्रेस करण्यात अपयशी ठरले. पण अक्षय कुमार चित्रपटाव्यतिरिक्त स्पोर्ट्समध्ये देखील आपले नशीब आजमावणार आहे.

Akshay Kumar Cricket Team – अक्षय कुमारने केली शोषणा

Akshay Kumar Cricket Team

अक्षय कुमारने आपल्या सोशल मिडिया अकाऊंट इंस्टाग्रामवरून चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेयर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने घोषणा केली आहे कि तो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील श्रीनगर (जम्मू कश्मीर) च्या टीमचा ओनर (Akshay Kumar Cricket Team) बनला आहे. अभिनेत्याने लिहिले कि, चित्रपटांपासून स्टेडियम पर्यंत! मला हे सांगताना खूप अभिमान वाटत आहे कि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये श्रीनगर (जम्मू कश्मीर) च्या ओनरच्या रुपामध्ये येत आहे. माझ्या टीममध्ये खेळण्याचा एक चांस शिल्लक आहे. अभिनेत्याने टीममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक शेयर केली आहे.

वर्क फ्रंट

त्याने पुढे म्हंटले कि आयएसपीएल आणि श्रीनगर संघाचा भाग बनून मला आनंद होत आहे. हि टूर्नामेंट क्रिकेट जगतामधील एक गेम चेंजर ठरेल आणि या स्पोर्टिंग एंडेवरला समोरून खेल्यासाठी उत्सुक आहे. अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रोहित शेट्टीच्या सिंघम 3 या मल्टीस्टारर चित्रपटामध्ये तो दिसणार आहे. त्याचे बड़े मियां छोटे मियां’ आणि ‘स्काई फोर्स’ चित्रपट देखील लाईनमध्ये आहेत.

Also Read: विक्की कौशलचा ‘सॅम बहादुर’ ओटीटीवर रिलीज करण्याची तयारी, या दिवशी होणार रिलीज

Leave a comment