Allu Arjun Pushpa 2 Update: अल्लू अर्जुनने धुडकावली 10 करोडची ऑफर, कारण जाणून तुम्ही देखील कौतुक कराल

Allu Arjun Pushpa 2 Update: अल्लूच्या अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रूल’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान आता एक बातमी समोर आली आहे कि तेलगु स्टारने दारूच्या एका ब्रँडची ऑफर नाकारली आहे. चित्रपटामध्ये जेव्हा जेव्हा पुष्पा धूम्रपान करतो तेव्ह त्याचा logo स्क्रीनवर दाखवायचा होता. रिपोर्टनुसार ब्रँडने चित्रपटाच्या मेकर्सला 10 करोडची मोठी रक्कम ऑफर केली होती, पण अल्लू अर्जुनने असे सांगून ऑफर नाकारली कि, मला अशा ब्रँडचे समर्थन करायचे नाही.

Allu Arjun Pushpa 2 Update

असे पहिल्यांदाच झालेले नाही कि अल्लू अर्जुनने एखाद्या दारूच्या ब्रँडची ऑफर नाकारली आहे. ‘पुष्पा: द राइज’ सुपरहिट झाल्यानंतर एका तंबाखू कंपनीने अभिनेत्याला जाहिरातीसाठी मोठी रक्कम ऑफर केल्याची बातमी आली होती. पण अल्लू अर्जुनने ती ऑफर नाकारली होती.

अल्लू अर्जुनने मोठ्या ब्रँडची ऑफर नाकारली – Allu Arjun Pushpa 2 Update

पुष्पाबद्दल (Allu Arjun Pushpa 2 Update) बोलायचे झाले तर सुकुमारच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनला आहे. ‘पुष्पा: द राइज’ 2021 मध्ये रिलीज झाला होता आणि चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. एक्शन ड्रामा चित्रपटामध्ये लाल चंदनच्या तस्करीची कथा होती. अल्लू अर्जुनला या चित्रपटातील अभिनयासाठी नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Allu Arjun Pushpa 2 Update

‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनचे पोस्टर

या वर्षाच्या सुरुवातीला अल्लू अर्जुनने पुष्पा 2 मधील आपला फर्स्ट-लुक पोस्टर शेयर केला होता, ज्यामध्ये तो साडीत घातलेला दिसला होता आणि चेहरा निळ्या आणि लाल रंगाने माखलेला होता. त्याने बांगड्या, दाघीने, नाथ आणि झुमके देखील घातले होते. नंतर चित्रपटामधील फहद फासिलचा लुक पोस्टर देखील जारी करण्यात आला.

चाहते आता रश्मिका मंदानाच्या लुक पोस्टरची वाट पाहत आहेत. यादरम्यान सई पल्लवी देखील पुष्पाच्या सिक्वेलमध्ये सामील झाल्याची चर्चा आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ डिसेंबर 2023 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. तथापि, ‘पुष्पा 2’ 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

Also Read: Tripti Dimri ने शेयर केला ‘एनिमल’चा अनुभव: म्हणाली; मला पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत

Leave a comment