Sugandha Mishra Baby: द कपिल शर्मा शो स्टार ‘सुगंधा मिश्रा’ झाली आई, व्हिडीओ शेयर करत दाखवली बाळाची पहिली झलक

Sugandha Mishra Baby: द कपिल शर्मा शो फेम आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा आई झाली आहे. नुकतेच कॉमेडीयनने एका मुलीला जन्म दिला. तिचा पती आणि कॉमेडीयन संकेत भोसलेने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून हि गुड न्यूज शेयर केली आहे. सुगंधाने ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. लग्नाच्या अडीच वर्षानंतर दोघे आई-बाबा झाले आहेत. कपलने सोशल मिडियावर एक क्युट व्हिडीओ शेयर करून आपल्या बेबी गर्लची पहिली झलक दाखवली आहे.

Sugandha Mishra Baby

हॉस्पिटलमधून शेअर केला व्हिडिओ – Sugandha Mishra Baby

संकेत भोसलेने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हॉस्पिटलमधून एक व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओ तो हे सांगताना दिसत आहे कि तो बाबा बनला आहे. इतकेच नाही तर त्याने सुगंधाची देखील हॉस्पिटलमधून झलक दाखवली. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे कि कपल मुलीच्या जन्मानंतर खूपच खुश आहे. इतकेच नाही तर संकेतने आपल्या मुलीचा पहिला फोटो (Sugandha Mishra Baby) देखील शेयर केला आहे. फोटोमध्ये सुगंध आणि संकेत आपल्या मुलीसोबत पोज देताना दिसत आहेत. तथापि त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा रीवील केला नाही. त्यांनी इमोजीने मुलीचा चेहरा झाकला आहे.

Sugandha Mishra Baby

सेलेब्सनी कपलला दिल्या शुभेच्छा

व्हिडीओ शेयर करत संकेतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, जगातील सर्वात सुंदर चमत्कार, आमच्या प्रेमाचे प्रतिक आशीर्वाद मिळाला आहे. आम्हाला एक गोड मुलीचा आशीर्वाद मिळाला आहे. तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव असाच होत राहो. संकेतच्या या पोस्टवर चाहते आणि सेलेब्स भरभरून शुभेच्छा देत आहेत. सुगंधा मिश्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती कपिल शर्मा शोमध्ये पाहायला मिळाली आहे. तिची कॉमेडी आणि सिंगिंग अप्रतिम आहे. 2021 मध्ये तिने कॉमेडीयन संकेत भोसले सोबत लग्न केले होते.

Also Read: अल्लू अर्जुनने धुडकावली 10 करोडची ऑफर, कारण जाणून तुम्ही देखील कौतुक कराल

Leave a comment