एमी जॅक्सनने बॉयफ्रेंडसोबत केली एंगेजमेंट, स्वित्झर्लंडमधून शेयर केले रोमँटिक फोटो

Amy Jackson Engagement: अभिनेत्री एमी जॅक्सन आणि एड वेस्टविकने एंगेजमेंट केली आहे. अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेयर करून चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. एमी जॅक्सन आणि ब्रिटीश अभिनेता एड वेस्टविक बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अभिनेत्यांने फिल्मी अंदाजामध्ये एमी जॅक्सनला रिंग घातली.

Amy Jackson Engagement

Amy Jackson Engagement – एमी जॅक्सनने केली एंगेजमेंट

एमी जॅक्सन आणि तिचा बॉयफ्रेंड एड वेस्टविक यांनी नुकतेच एंगेजमेंट (Amy Jackson Engagement) केली आहे. अभिनेत्यांने फिल्मी अंदाजामध्ये स्वित्झर्लंडमधील एका पुलावर एमीला प्रपोज केले. फोटोमध्ये एमी व्हाईट कलरचा ड्रेस घातलेली दिसत आहे. एडने जाकेट, ऑलिव्ह ग्रीन पँट आणि शूज घातले आहेत. पहिल्या फोटोमध्ये एड गुडघ्यावर बसलेला पाहायला मिळत आहे आणि एमीने आनंदाने आपल्या चेहऱ्यावर हात ठेवला आहे.

कोण आहे एड वेस्टविक

एड वेस्टविक हॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. 2007 पासून ते 2012 पर्यंत सीडब्ल्यू नेटर्वकच्या गॉसिप गर्लमध्ये तो प्लेबॉय चक बेसच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. या रोलमध्ये त्याला खूप लोकप्रियता मिळाली होती.

एमी जॅक्सन वर्कफ्रंट

एमी जॅक्सनने फक्त बॉलीवूडच नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील काम केले आहे. साऊथमध्ये तिच्या अभिनयाला खूपच पसंती मिळाली. एमी जॅक्सनने तेलगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर एक दिवाना था चित्रपटामध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. एमी क्रॅक या एक्शन थ्रिलर चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. क्रॅकमध्ये एमी शिवाय विद्युत जामवाल, अर्जुन रामपाल आणि नोरा फतेही देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. क्रॅक हा सर्व्हायव्हल थ्रिलर आहे.

हेही वाचा: लग्नाच्या 3 वर्षानंतर आई होणार यामी गौतम? बेबी बंप लपवतानाचा व्हिडीओ व्हायरल