आयुष्मान भारत योजना कार्ड असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकार वाढवू शकते ‘इतक्या’ लाखांपर्यंत विमा संरक्षण

आयुष्मान भारत योजना: यावेळी बजटमध्ये सरकारी विमा योजना प्रधानमंत्र जन आरोग्य योजना ज्याला आयुष्मान भारत योजना देखील म्हंटले जाते, याबद्दल मोठी घोषणा होऊ शकते. माहितीनुसार या योजने अंतर्गत सरकार इन्शुरन्स कव्हर वाढवू शकते. आयसीआयसीआय लोम्बार्ड, स्टार इन्शुरन्ससाठी हि खूपच चांगली बातमी असू शकते.

किती वाढू शकते विमा संरक्षण

बजटमध्ये सरकार PMJAY (आयुष्मान भारत योजना) चे विमा संरक्षण वाढवू शकते. 1 फेब्रुवारी 2024 सादर सादर होणाऱ्या बजटमध्ये PMJAY चे विमा संरक्षण 5 लाखांवरून 10-15 लाख रुपयांपर्यंत केले जाऊ शकते. त्याचबरोबर या योजनेमध्ये सुमारे 60 करोड लोकांचा हेल्थ कव्हर वाढवण्यावर विचार केला जाऊ शकतो. सरकार्नुसार कव्हर वाढवल्याने खर्च जास्त वाढणार नाही. शिवाय मध्यमवर्गासाठी अनुदानित आरोग्य विमा आणण्याचा देखील विचार केला जाऊ शकतो.

काय आहे PMJAY (आयुष्मान भारत योजना)

मोदी सरकारने 2018 च्या बजटमध्ये आयुष्मान भारत योजनाची घोषणा केली होती, ज्यामध्ये मुख्य रूपाने दोन उद्दिष्टे होती – देशात एक लाख हेल्था अँड वेलनेस सेंटर्स तयार करने आणि 10 करोड कुटुंबाना 5 लाख रुपये प्रतिवर्ष आरोग्य विमा संरक्षणसोबत जोडणे.

आयुष्मान भारत योजना
PMJAY अंतर्गत मिळणारे फायदे
  • प्रत्येक पात्र कुटुंबासाठी दरवर्षी 5 लाखांपर्यंत विनामूल्य उपचाराचा लाभ
  • योजने संबंधित देशभरातील कोणत्याही चिन्हित किंवा खाजगी रुग्णालयात विनामुल्य उपचार सुविधा
  • भरती होण्यापूर्वी 7 दिवस अगोदर तपासणी, भरती दरम्यान उपचार, भोजन आणि डिस्चार्जच्या 10 दिवसांनंतर तपासणी आणि विनामुल्य औषधे
  • या योजनेंतर्गत रुग्णालयात दाखल होण्याच्या स्थितीदरम्यान, कोरोना, कर्करोग, मूत्रपिंडाचा आजार, हृदयरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया डायलिसिस, गुडघा आणि हिप प्रत्यारोपण, नि:संतानता, मोतीबिंदू आणि इतर चिन्हित गंभीर आजारांवर शुल्क केले जातात. मुख्यमंत्री कोविड-19 उपचार योजना अंतर्गत देखील पत्र लाभार्थींना नि:शुल्क उपचार मिळतात.

Leave a comment