Gold Price Today: सोन्याच्या दरामध्ये तेजी, भाव 61300 च्या पुढे, चेक करा आजचा रेट

Gold Price Today: सोने आणि चांदीच्या दारामध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. बुलियन मार्केटमध्ये जोरदार महागाईचे आकडे आणि US FED चे निर्णय पाहायला मिळत आहेत. देशांतर्गत आणि विदेशी मार्केटमध्ये सोन्या चांदीच्या दारामध्ये हालचाल पाहायला मिळत आहे. डोमेस्टिक मार्केटमध्ये सोन्याचा भाव 61300 च्या पुढे गेला आहे. तर कोमॅक्सवरील सोन्याचा भाव 3 आठवड्यानंतर पहिल्यांदाच 2000 डॉलरच्या खाली घसरला आहे.

Gold Price Today – डोमेस्टिक मार्केट

MCX वर सोन्याच्या दारामध्ये 200 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर 61330 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर चांदी देखील 300 रुपयांचा मजबुतीसोबत व्यवहार करत आहे. MCX वर चांदीचा दर 72174 प्रती किलो ग्रॅम ट्रेड करत आहे.

विदेशी मार्केटमध्ये सोन्या-चांदीचा दर

अमेरिकामध्ये महागाईचे आकडे जारी होण्याअगोदर विदेशी मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या दरामध्ये (Gold Price Today) वरच्या स्तरावरवर म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. कोमॅक्सवरील सोन्याचा दर प्रति ऑन्सवर 2000 डॉलरवर ट्रेड करत आहे. सुमारे 3 आठवड्यांनंतर, सोन्याचे दर 2000 डॉलरच्या खाली घसरले आहेत. चांदी देखील 1 महिन्याच्या नीचांकावर ट्रेड करत आहे. कोमॅक्सवरील चांदीची किंमत प्रति ऑन्स 23.19 डॉलरवर आली आहे.

Leave a comment