Dunki Box Office Collection Day 2: दुसऱ्या दिवशी ‘डंकी’ चा धुमाकूळ, शाहरुख खानच्या चित्रपटाने कमवले इतके करोड

Dunki Box Office Collection Day 2: राजकुमार हिरानीचा ‘डंकी’ चित्रपट चित्रपटागृहांमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाला दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तथापि यादरम्यान चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पठाण आणि जवान नंतर शाहरुख खानचा हा तिसरा बिग बजट चित्रपट आहे. कमाईच्या बाबतीत सध्या हा चित्रपट पठाण आणि जवानच्या जरा मागेच आहे, पण येणाऱ्या दिवसांमध्ये हा आकडा वाढू शकतो. पहिल्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने 35.23 करोडची ओपनिंग केली आहे. आता लोकांना हि उस्तुकता लागून राहिली आहे कि चित्रपट दुसऱ्या दिवशी किती कमाई करतो.

Dunki Box Office Collection Day 2

डंकी चे दुसऱ्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Dunki Box Office Collection Day 2)

डंकी च्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खानच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी देखील शानदार प्रदर्शन केले. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 30 ते 35 करोडची कमाई (Dunki Box Office Collection Day 2) केली, जी पहिल्या दिवसाच्या तुलनेमध्ये कमी आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे कि शनिवार आणि रविवारी चित्रपट काय कमाल दाखवतो, कारण विकेंडला नेहमीच कलेक्शनचा आकडा वाढतो. शाहरुखच्या मागच्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर डंकी पेक्षा जास्त कमाई केली होती. पठाणने दुसऱ्या दिवशी 70 करोड तर जवानने 53 करोडचे कलेक्शन केले होते.

राजकुमार हिरानी आहेत ‘डंकी’ चे दिग्दर्शक

डंकी चे दिग्दर्शक राजकुमार हिरानी मुन्नाभाई MBBS, पीके आणि थ्री इडियट्स सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. डंकी (Dunki) मध्ये शाहरुख खान शिवाय तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन ईरानी, सतीश शाह आणि विक्रम कोचर देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. चित्रपट 120 करोडच्या बजटमध्ये बनला आहे.

हेही वाचा: पठाण आणि जवान नंतर शाहरुख खानची हॅटट्रिक, ‘डंकी’ची पहिल्या दिवशी छप्पर फाड ओपनिंग

Leave a comment