Dunki Box Office Collection Day 1: पठाण आणि जवान नंतर शाहरुख खानची हॅटट्रिक, ‘डंकी’ची पहिल्या दिवशी छप्पर फाड ओपनिंग

Dunki Box Office Collection Day 1: शाहरुख खानची बहुप्रतीक्षित चित्रपट डंकी मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. शाहरुख खानचा हा या वर्षातील तिसरा मोठा चित्रपट आहे. शाहरुखच्या डंकी (Dunki) बद्दल चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे आणि आशा केली जात होती कि पहिल्या दिवशी चित्रपट बंपर ओपनिंग करेल. चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या अपेक्षेप्रमाणे जबरदस्त कमाई केली आहे. शाहरुख खानची बॅंक टू बॅंक हि तिसरी बंपर ओप्किंग आहे. याआधी जवान आणि पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. शाहरुख खानने डंकीच्या रिलीज सोबत हे सिद्ध केले आहे कि तो बॉलीवूड खऱ्या अर्थाने किंग आहे.

Dunki Box Office Collection Day 1

डंकी चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन (Dunki Box Office Collection Day 1)

रिपोर्टनुसार शाहरुख खानच्या डंकी चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 30 ते 35 करोडची ओपनिंग (Dunki Box Office Collection Day 1) करू शकतो. तथापि हा चित्रपट पठाण आणि जवानचा रेकॉर्ड मोडीत काढेल हे सध्या सांगता येत नाही. पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 55 करोडची कमाई केली होती. तर जवान चित्रपटाने 75 करोडची तुफानी कमाई केली होती.

120 करोडच्या बजटमध्ये बनला डंकी (Dunki Budget)

डंकी चित्रपट 120 करोडच्या बजटमध्ये बनला आहे. चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. यावरुन असा अंदाज लावला जात आहे कि डंकी चित्रपट पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या बजटचे सर्व पैसे काढेल. चित्रपटामध्ये शाहरुख खान शिवाय विक्की कौशल, तापसी पन्नू, बोमन ईरानी, सतीश शाह, विक्रम कोचर सारखे नामी कलाकार आहेत.

हेही वाचा: Salaar Advance Booking: सालारच्या अ‍ॅडवांस बुकिंगचे वादळ, बुक माय शो ची वेबसाईट झाली क्रॅश

Leave a comment