वडिलांच्या संपत्तीवर मुली केव्हा हक्क दाखवू शकतात, Fathers Property Daughter Rights कायदा काय सांगतो समजून घ्या

Fathers Property Daughter Rights: एखाद्या मुलीचे लहान वयातच लग्न झाले आणि लग्नानंतर तिच्या नवऱ्याने आणि तिच्या सासरकडच्या मंडळीनी तिचा छळ केला आणि त्यात ती मुलगी कोठेही कमवत नसेल तर तिचे पूर्ण आयुष्य बेकार ठरते. मग अश्यावेळी मुलीची समजूत काढून वेळ मारून नेण्यापलिकडे काही उरत नाही. तसेच त्यात आणखी भर म्हणून त्या मुलीचे आई वडील देखील त्या मुलीस मदत करण्यास तयार नसतील आणि भाऊ पण वडिलांच्या संपत्तीचा एक तुकडादेखील द्यायचा तयार नसेल तर अशा बिकट परिस्थितीत त्या मुलीने काय करावे? स्वतःचा खर्च कसा भागवावा ? हा प्रश्न पड़ने स्वाभाविक आहे. चला तर मग पाहुयात याबद्दल थोडस.

बर्यााच वेळा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की, लग्न झालेल्या मुलीचा तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर हक्क असतो का? याबद्दल थोड्याच लोकांना माहिती आहे. बर्या च लोकांना याबद्दलची कायदेशीर तरतूद माहित नाही. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीत विवाहित मुलीचा कायदेशीर हक्क आहे हे आम्ही आज सांगणार आहोत.

Fathers Property Daughter Rights

Fathers Property Daughter Rights

मुलींना पितृ संपत्तीत समान वाटा देण्यासाठी २००५ मध्ये हिंदु उत्तराधिकार कायद्यामध्ये बदल करण्यात आला होता. वडिलांच्या संपत्तीच्या बाबतीत आता मुलीच्या जन्माबरोबरच वाटा असतो, तर मुलीने स्वतः कमवलेली मालमत्ता तिच्या इच्छेच्या तरतुदीनुसार वाटप केली जाते. वडील मरण पावले आणि त्याच्या इच्छा नसताना देखील त्यांच्या मालमत्तेवर मुलगा व मुलगी यांचा समान हक्क राहतो.

२००५ मध्ये यासंबधिचा कायदयात बदल करण्यात आला. हिंदू वारसा कायदा १९५६ च्या तरतुदीनुसार मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क दिले गेले नव्हते. परंतु ही असमानता दाखवणारा कायदा ९ सप्टेंबर २००५ रोजी हिंदु उत्तराधिकार कायद्यात सुधारित करून नव्याने तयार करण्यात आला. ज्या अंतर्गत हिंदूंमध्ये मुलामुलींच्या मध्ये मालमत्ता समान विभागली जाऊ शकते.

Fathers Property Daughter Rights

१) वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर :- हिंदू कायद्यातील मालमत्ता दोन भागांमध्ये विभागली आहे – वडिलोपार्जित आणि स्वयंरोजगारीत . वडिलोपार्जित मालमत्तांमध्ये पूर्वजांपासून ताब्यात असलेल्या मालमत्तेचा समावेश असतो, ज्यात जन्माधीच्या ४ पिढी आधीपासून असलेली मालमत्ता यात समविष्ट असते. अशा मालमत्तेवर मुलांचा जन्मसिद्ध हक्क असतो, मग ते मुलगा किंवा मुलगी. मात्र २००५ पूर्वी, अशा मालमत्तेवर फक्त मुलाचा हक्क असायचा. तथापि, २००५ मध्ये हिंदू कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर वडील त्यांच्या मनमानी अशी मालमत्ता वाटू शकत नाहीत. म्हणजेच वाटणी मध्ये मुलीला सामायिक करण्यास नकार देऊ शकत नाही. आता कायदानुसार Fathers Property Daughter Rights मुलगी जन्माला येताच तिला वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क मिळतो.

२) वडिलांनी स्वत: कमवलेली मालमत्ता :- वडिलांच्या स्वत: च्या मालकीच्या मालमत्तेच्या बाबतीत, मुलींची बाजू कमकुवत असते कारण जर वडिलांनी जमीन विकत घेतली असेल, घर स्वतः बांधले असेल किंवा स्वत: च्या पैशाने विकत घेतले असेल तर ते ही मालमत्ता ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतात. स्वतःच्या इच्छेनुसार कोणालाही त्यांची स्वतःची मालमत्ता देणे हा वडिलांचा कायदेशीर अधिकार आहे. म्हणजेच, जर वडिलांनी मुलीला स्वत: च्या मालमत्तेत वाटा देण्यास नकार दिला तर मुलगी काहीच करू शकत नाही.

Fathers Property Daughter Rights

३) मृत्यपत्र (वसियात) लिहायच्या आधीच वडिलांचा मृत्यू झाल्यास :- मृत्युपत्र लिहिण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास, सर्व कायदेशीर वारसांना त्यांच्या मालमत्तेवर समान हक्क असतो. हिंदू उत्तराधिकार कायदा पुरुष वारसांना चार वर्गांमध्ये वर्गीकृत करतो आणि वडिलांच्या मालमत्तेवरचा पहिला हक्क पहिल्या वर्गाच्या वारसांचा आहे. यामध्ये विधवा पत्नी , मुली आणि मुले तसेच इतरांचा समावेश असतो. प्रत्येक वारसांना मालमत्तेवर समान हक्क असतो. याचा अर्थ असा की एक मुलगी म्हणून Fathers Property Daughter Rights आपल्याला आपल्या वडिलांच्या मालमत्तेवर पूर्ण हक्क असतो.

Fathers Property Daughter Rights

४) मुलगी विवाहित असल्यास :- २००५ च्या पूर्वी हिंदू उत्तराधिकार कायद्यात मुलींकडे हिंदू अविभाजित कुटुंबाचे सदस्य म्हणून पाहिले जात होते. म्हणजेच लग्नानंतर कागदोपत्री ती तिच्या माहेरच्या कुटुंबाचा भाग नाही असे मानले जायचे. २००५ च्या तरतुदीनंतर हा कायदा बदलण्यात आला.

५) जर मुलीचा जन्म २००५ पूर्वी झाला असेल आणि त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर :- ९ सप्टेंबर २००५ पासून हिंदू उत्तराधिकार कायद्यात सुधारणा लागू झाली. कायद्यानुसार असे म्हटले आहे की या तारखेच्या आधी किंवा नंतर मुलगी जन्माला आली असली तरी तिच्या भावाला व तिला वडिलांच्या संपत्तीत तिला समान वाटा असेल. दुसरीकडे, ९ सप्टेंबर २००५ रोजी वडील जिवंत असतानाच मुलगी आपल्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळवू शकते. या तारखेपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असता, मुलीला Fathers Property Daughter Rights पितृत्वाच्या मालमत्तेवर कोणताही हक्क नाही आणि वडिलांनी स्वत: कमवलेली मालमत्तेची त्याच्या इच्छेनुसार विभागणी केली जाते.

Also Read

==> Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या RBI काय म्हणाली

Leave a comment