हळद लागली…! गौतमी देशपांडेला लागली स्वानंद तेंडुलकरची उष्टी हळद, हळदीचे फोटो आले समोर

Gautami Deshpande and Swanand Haladi : सध्या लग्नाचं हंगाम जोरात सुरु आहे. यानिमित्ताने कलाकार मंडळी देखील विवाहबंधनात अडकून आपल्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरु करत आहेत. काल अभिनेत्री गौतमी देशपांडेने थेट हळदीचे फोटो शेयर करून आपल्या प्रेमाची कबुली दिली. अभिनेता स्वानंद तेंडुलकरसोबत ती विवाहबंधनात अडकणार आहे. आज गौतमी आणि स्वानंद याला हळद लागली असून हळदीचे फोटो (Gautami Deshpande and Swanand Haladi Pics)सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

सोशल मिडियावर फोटो व्हायरल (Gautami Deshpande and Swanand Haladi)

गौतमी आणि स्वानंद तेंडुलकरच्या हळदीचे फोटो अभिनेता सारंग साठे आणि त्याची पत्नी पॉलाने सोशल मिडियावर शेयर केले आहेत. फोटो शेयर करत त्यांनी कुंकू हसलं, हळद पण हसली असं कॅप्शन दिलं आहे. फोटोमध्ये गौतमी-स्वानंद पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहेत.

Gautami Deshpande and Swanand Haladi
Gautami Deshpande and Swanand Haladi
Gautami Deshpande and Swanand Haladi

त्याचबरोबर भाई, भाई, भाई लिहित सारंगची पत्नी पॉलाने स्वानंदच्या हळदीचा फोटो शेयर केला आहे. शिवाय गौतमी आणि स्वानंद यांच्या हळदीचा व्हिडीओ देखील इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेयर करण्यात आला आहे.

Gautami Deshpande and Swanand Haladi
Gautami Deshpande and Swanand Haladi

दरम्यान गौतमी आणि स्वानंद हे दोघे रिलेशनशिप असल्याच्या चर्चा एका फोटोमुळे खूपच रंगल्या होत्या. पण दोघांनी यावर कधीच भाष्य केले नाही. त्यानंतर गौतमीची बहिण मृण्मयीने तिच्या एका सोशल मिडिया पोस्टमधून दोघांच्या लग्नाची हिंट दिली. त्यामुळे चाहत्यांना गौतमी लवकरच विवाहबंधनात अडकणार यांचा अंदाज होता. अखेर आता हि गोष्ट खरी ठरली आहे. नुकतेच गौतमीने यंदा सिक्रेट सांताचं आगमन लवकर झालंय…नवी सुरुवात असं कॅप्शन देत मेहेंदीचे फोटो शेयर केले होते ज्याला #SwaG #lafdi असे हॅशटॅग तिने दिले होते.

गौतमी देशपांडेचा होणारा नवरा काय करतो

गौतमीचा होणारा नवरा मराठीमधील पाहिलं डिजिटल चॅनेल भाडिपाचा बिजनेस हेड आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. 25 डिसेंबर रोजी दोघे विवाहबंधनात अडकून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत.

हेही वाचा: गौतमीच्या लग्नाआधीची लगबग सुरु, देशपांडे सिस्टर्सचे फोटो व्हायरल, नक्षीदार मेहंदीवर खिळल्या नजरा

Leave a comment