बिग बॉस 17 मधून बाहेर पडल्यानंतर Aishwarya Sharma ला राग अनावर, म्हणाली; ‘अचानक बिग बॉस म्हणाले कि…’

Bigg Boss 17 Aishwarya Sharma Elimination : ‘गुम है किसी के प्यार में’ मधून लोकप्रिय झालेली ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) वादग्रस्त रियालिटी शो बिग बॉस सीजन 17 मधून बाहेर पडली आहे. शोमध्ये अल्यापसून ऐश्वर्या विक्की जैन आणि अंकिता लोखंडेसोबत आपल्या भांडणामुळे चर्चेत राहिली. आता शोमध्ये तिचा पत्ता साफ झाला आहे आणि याचे कारण ईशा मालवीय (Isha Malviya) आहे.

ईशा मालवीय ने ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) ला केले आउट

बिग बॉसमध्ये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून ईशा मालवीय ने ऐश्वर्या शर्मा ला शोच्या बाहेर फेकले. ईशा ला रूल ब्रेक च्या आधारावर अंकिता, अनुराग दोभाल आणि ऐश्वर्या मधील एका बाहेर काधाच्य्हे होते आणि ईशाने मतभेदांमुळे ऐश्वर्याला बाहेरचा रस्ता दाखवला. तिने म्हंटले कि जिच्यासोबत घरामध्ये माझे जमत नाही तिला बाहेर काढायचे आहे. ईशाच्या या निर्णयाचा नील भट्ट आणि रिंकू धवनने विरोध केला होता.

बाहेर पडल्यानंतर काय म्हणाली ऐश्वर्या शर्मा

बिग बॉस 17 मधून बाहेर पडल्यानंतर ऐश्वर्या शर्माचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल हॉट आहे, जो तिच्या एविक्शन नंतरचा आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्याने म्हंटले कि, अचानक बिग बॉस म्हणाले कि तुमचे बिंग फुटले. अभिनेत्रीने सांगितले कि यानंतर तिला मोठा धक्का बसला होता. ऐश्वर्याने पुढे म्हंटले कि, माझ्या मनामध्ये असा विचारच आला नाही कि यार, तू इतकं चांगलं करत आहेस, मी ते करत नाहीय, मला ते जमलं नाही.

हा व्हिडीओ पाहून युजरने म्हंटले कि सर्वात समाधानी एविक्शन आहे. तर एकाने म्हंटले कि नीलच्या डोक्याचे दही केले बरोबर झाले. तर दुसऱ्या एकाने म्हंटले कि आता नील आपली गेम खेळू शकेल. नाही तर बेबी बाबू म्हणत बसायचा. एकाने म्हंटले कि थँक गॉड ती बाहे गेली.

हेही वाचा: आयशा खानने मुनव्वर फारुकीवर केला गंभीर आरोप, म्हणाली; ‘एकाच वेळी दोन मुलींसोबत’

Leave a comment