History of Arjan Vailly: कोण होते अर्जन वैली, ज्यांच्यावर सुपरहिट झाले ‘Animal’ चे गाणे

History of Arjan Vailly: रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल स्टारर अ‍ॅनिमल चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत आहे. चित्रपटासोबत यामधील ‘अर्जन वैली’ गाणे देखील खूपच व्हायरल झाले आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर हे गाणे मोठ्या प्रमाणात शेयर केले जात आहे. भूपिंदर बब्बल यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलेले हे गाणे सध्या पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का कि हे गाणे ऐतिहासिक घटनेशी संबंधित आहे. अ‍ॅनिमल (Animal) चित्रपट सध्या या गाण्यामुळे देखील खूपच चर्चेमध्ये आहे.

History of Arjan Vailly – शीख गुरूंच्या इतिहासाशी संबंधित आहे गाणे

अर्जन वैली ने पैर जोड़ के गंडासी मारी… गाण्याचे हे बोल आपल्यामध्ये जितका उत्साह संचारतो, तितकाच गाण्याचा इतिहास देखील विलक्षण आहे. अर्जन वैली गाणे खालसा सैन्याचा नेता अर्जुन सिंह नलवा यांचे चरित्र दर्शवतो. अर्जन सिंह नलवा महाराजा रणजीत सिंह यांच्या खालसा सैन्याचे कमांडर हरि सिंह नलवाच्या दोन मुलांपैकी एक होते. (History of Arjan Vailly) महान खालसा योद्धा हरि सिंह नलवा यांच्या बहादुरीच्या किस्स्यांनी इंटरनेट भरून पडले आहे.

History of Arjan Vailly – हरि सिंह नलवा यांचा मुलगा होता अर्जन वैली

History of Arjan Vailly

अफगाणांचा पराभव करणाऱ्या खालसा सैन्याचा सेनापती हरिसिंह नलवा यांना बागमार म्हंटले जाते. असे म्हंटले जाते कि त्यांनी आपल्या हाताने वाघाचा जबडा फाडून त्याला मारले होते. त्यांच्या भीतीने अफगाणी थरथर कापत असत. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हरिसिंह नलवा यांनी महाराजा रणजितसिंग यांच्यासाठी सर्वकाही पालटले होते. आजच्या पाकिस्तानपर्यंत अफगाणिस्तानचे राज्य होते. ज्यांच्यासमोर बलाढ्य सैन्य देखील हार मानत होते. पंजाब वाटेवर असल्याने त्याच्यावर सतत हमला होत होता.

पण जेव्हा रणजित सिंग यांच्यासाठी जेव्हा नलवाची तलवार बाहेर पडली तेव्हा अफगाणी हल्लेखोर शांत झाले. नलवा अफगाणींच्या घरामध्ये घुसून लढा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी युद्धभूमीवर असे शौर्य दाखवले कि अफगाणिस्तानात त्याच्याबद्दल म्हणी प्रचलित झाल्या. तिथे लहान मुलांना आज देखील हरी सिंह नलवा यांचे नाव घेऊन घाबरवले जाते. नलवा यांनीच सोमनाथ मंदिरामधील लुट सन्मानाने परत आणली होती. हरि सिंह नलवा यांचा मुलगा अर्जन सिंह नलवा यांनाच अर्जन वैली म्हंटले जाते. अर्जन सिंह यांनी त्यांचा भावू जवाहर सिंह सोबत मिळून इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता.

History of Arjan Vailly

याच अर्जन सिंह यांचे चरित्र चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. अर्जन सिंह हे आपल्या वडिलांप्रमाणेच शूर सेनानी होते. अर्जन सिंह यांचा जन्म लुधियानाजवळील काउंके गावामध्ये झाला होता. या गाण्याचा वापर आता संदीप रेड्डी वांगा यांनी आपल्या चित्रपटामध्ये केला आहे. हे गाणे रणबीर कपूरवर चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे त्या सीनसाठी इतके फिट झाले आहे कि दर्शकांना ते खूपच आवडले आहे. भूपिंदर बब्बल यांच्या आवाजामध्ये हे गाणे आणखीनच दमदार झाले आहे हे नक्की.

History of Arjan Vailly

‘खाड़े विच डांग खड़की, ओथे हो गई लड़ाई भारी.. हो अर्जन वैली ने पैर जोड़ के गंडासी मारी..’ गाण्याच्या या ओळीमध्ये वैलीचा अर्थ जो युद्धाला घाबरत नाही आणि एखाद्याचा हक्क मिळवून देण्यासाठी तो कोणत्याही ठरला जाऊ शकतो असा आहे. हे गाणे सर्वप्रथम ढाडी जत्थे यांनी मुघलांशी लढताना श्री गुरु गोविंद सिंग यांच्यासाठी तयार केले होते. (History of Arjan Vailly) हे गाणे भारतीय दर्शकांना सांगण्यासाठी पुरेसे आहे कि आपल्या पूर्वजांनी रणांगणात हल्लेखोरांचा कसा सामना केला.

हेही वाचा
==> Animal OTT Release: ओटीटी वर लवकरच पाहायला मिळणार रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट, या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Leave a comment