जेव्हा गरीब वडिलांनी घरी आणली सेकंड हँड सायकल, पाहण्यासारखा होता वडील आणि मुलाचा आनंद, पहा डोळ्यात अश्रू आणणारा व्हिडीओ…

Viral Video: ते म्हणतात ना नो मनी, नो प्रॉब्लम्सचा कॉन्सेप्ट फक्त तेव्हा सत्य होतो जेव्हा तुम्ही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधू लागता. कुटुंबातील लोकांसोबत तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हसण्याची संधी नक्की येते. याचे एक उदाहरण तुम्ही व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहू शकता. व्हिडीओ मध्ये पाहू शकता कि एक आनंदी मुलगा आपल्या वडिलांना एक जुनी सायकल घरी आणताना पाहून किती खुश होतो. त्याच्या आनंदाला सीमाच राहत नाही.

आईएएस अवनीश शरण यांनी शेयर केला व्हिडीओ

व्हिडीओ ट्विटरवर शेयर करत आईएएस अवनीश शरणने यांनी लिहिले आहे कि हि फक्त एक सेकंड हँड सायकल आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. त्यांची अभिव्यक्ती सांगते कि त्यांनी एक नवीन मर्सिडीज बेंज खरेदी केली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता कि एका गावामध्ये एक झोपडीच्या समोर एक जून सायकल उभी आहे आणि एक व्यक्ती सायकलला हार घालतो आणि त्यावर पाणी शिंपडतो. तर दुसरीकडे एक मुलगा आनंदाने नाचत आहे आणि टाळ्या वाजवत आहे.

टाळ्या वाजवत असलेल्या मुलाला पाहून तुम्ही समजू शकता कि त्याच्या कुटुंबासाठी हि जुनी सायकल किती महत्वाची आहे. त्या वडिलांसाठी हि सायकल किती किंमती आहे हे फक्त त्याला मुलाला आणि त्याच्या वडिलांनाच माहिती आहे. सोशल मिडियावर आता पर्यंत हा व्हिडीओ जवळ २ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

व्हिडीओ लोकांच्या मनाला भिडला आहे. ट्वीटचे उत्तर देत एका युजरने लिहिले आहे कि हे गरीब आहेत साहेब, म्हणून प्रत्येक गोष्ट आणि लोकांना इतका सन्मान देतात. जर तुम्ही तुम्ही एखाद्या श्रीमंत व्यक्तीला विचारले तर तो तुम्हाला गुलाम समजेल आणि लाथ मारून सांगेल कि माझ्याकडे यापेक्षा चांगली गोष्ट आहे. हे एक गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील अंतर आहे आणि असा आनंद फक्त त्यांचा समजेल.

पहा व्हायरल व्हिडीओ

News Title: ias awanish sharan shared viral video