Merry Christmas Trailer: सस्पेंस आणि थ्रिलरने भरलेल्या ‘मैरी क्रिसमस’ चा ट्रेलर रिलीज, विजय सेतुपती आणि कॅटरीनाच्या लिपलॉकने वाढवली लोकांची उत्सुकता

Merry Christmas Trailer: 2024 ची सुरुवात बॉक्स ऑफिसवर दमदार होणार आहे, कारण पहिल्यादाच सुपरस्टार विजय सेतुपति आणि बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. होय कॅटरीना कैफ आणि विजय सेतुपति मैरी क्रिसमस (Merry Christmas) चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली आहे तेव्हापासून दर्शक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट आता फक्त 23 दिवसांनंतर चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

Merry Christmas Trailer

Merry Christmas Trailer रिलीज

12 जानेवारी 2024 रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. तत्पूर्वी मैरी क्रिसमस चा ट्रेलर (Merry Christmas Trailer) बुधवारी रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून हैराण व्हाल, कारण पहिल्यांदाच कॅटरीना कैफ आणि विजय सेतुपति भयानक अवतारामध्ये पाहायला मिळत आहेत. चित्रपट पूर्णपणे सस्पेंसने भरलेला आहे. ट्रेलरमध्ये विजय आणिक कॅटरीना क्रिसमस काही तास अगोदर एकमेकांना भेटतात. दोघे एकमेकांसाठी अनोळखी आहेत.

ट्रेलरमध्ये विजय-कॅटरीना रोमँटिक देखील होतात, तेव्हा अचानक काही सीन असे समोर येतात ज्यामुळे तुम्ही घाबरू देखील शकता. हे सस्पेंस सोबत रोमांच देखील उत्पन्न करतात. चित्रपटाच्या ट्रेलरने दर्शकांमध्ये उत्सुक्तन निर्माण केली आहे. मैरी क्रिसमस चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित एक आगामी भारतीय थ्रिलर चित्रपट आहे.

Merry Christmas Trailer

12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार चित्रपट

तमिळ आणि हिन्दी मध्ये एकाच वेळी शूट केलेल्या या चित्रपटामध्ये कॅटरीना कैफ आणि विजय सेतुपति लीड रोलमध्ये आहेत. हा चित्रपट राघवन, कैफ आणि संगीतकार प्रीतम यांच्या तमिळ डेब्यूसोबत विजय सेतुपतिचा तिसरा हिन्दी चित्रपट आहे. अनेकवेळा रिलीज डेट बदलल्यानंतर आता मैरी क्रिसमस 12 जानेवारी 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल.

हेही वाचा: पठाण आणि जवान नंतर शाहरुख खानची हॅटट्रिक, ‘डंकी’ची पहिल्या दिवशी छप्पर फाड ओपनिंग

Leave a comment