भारताचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्डकपमुळे खूपच चर्चेमध्ये आला आहे. त्याने वर्ल्डकप मध्ये केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान मोहम्मद शमी आता पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. नुकतेच त्याने आपल्या भाचीचा चौथा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला ज्याचे फोटो त्याने सोशल मिडियावर शेयर केले.