टीव्हीवरील प्रसिद्ध नागीण मौनी रॉय (Mouni Roy) आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ अनेकवेळा चाहत्यांसोबत शेयर करत असते. मौनी रॉय सोशल मिडियावर नेहमी सक्रीय असते. नेहमी फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत, जे पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. मौनी रॉयने सोशल मिडिया अकाऊंटवरून जे फोटो शेयर केले आहेत त्यामध्ये ती आदियोगी महादेवाचे दर्शन करताना पाहायला मिळत आहे.