Crakk Teaser Out: विद्युत जामवालच्या खतरनाक क्रॅक’चा टीजर रिलीज, अभिनेत्याचे स्टंट पाहून हैराण व्हाल

Crakk Teaser Out Now: विद्युत जामवाल अल्पावधीमध्येच बॉलीवूडमधील एक अ‍ॅक्शन स्टार म्हणून समोर आला आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये तो अप्रतिम स्टंट आणि अ‍ॅक्शनने सरप्राईज करत असतो. अशामध्ये तो त्याच्या नवीन क्रॅक चित्रपटामुळे चर्चेमध्ये आला आहे. चित्रपटाचा धमाकेदार टीजर नुकताच रिलीज झाला. ज्याची टॅगलाइन जीतेगा तो जिएगा अशी आहे. ‘क्रॅक’च्या टीजरमध्ये विद्युत जामवालचे स्टंट पाहून हैराण व्हाल.

Crakk Teaser Out

क्रॅकचा टीजर रिलीज – Crakk Teaser Out

Crakk च्या टीजरची (Crakk Teaser Out) सुरुवात विद्युत जामवालच्या डायलॉगने होते, ज्यामध्ये हे म्हणताना दिसतो कि ‘जिंदगी तो सबके साथ ही खेलती है, लेकिन असली प्लेयर वही है, जो जिंदगी के साथ खेले’ यानंतर विलेन अर्जुन रामपालची एंट्री होते, जो म्हणतो ‘इस खेल का सिर्फ एक रूल है जीतेगा तो जिएगा’ यावर विद्युत जामवाल म्हणतो डर से नहीं डेयरिंग से खेलता हूं और दिमाग से थोड़ा’

चाहत्यांनी विद्युत जामवालचे केले कौतुक

क्रॅक’चा टीजर अंगावर शहारे आणणारा आहे. खतरनाक स्टंट आणि अ‍ॅक्शन करणाऱ्या विद्युत जमावालला पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे कि ज्या चित्रपटामध्ये विद्युत जामवाल आहे तो चित्रपट इग्नोर केला जाऊ शकत नाही. एका चाहत्याने लिहिले आहे कि, मला तर अपेक्षाच नव्हती पण हा तर एकदम जबरदस्त टीजर आहे. थियेटरमध्ये खरच धुमाकूळ घालेल. आणखी एका चाहत्याने लीळीले आहे कि आम्ही बॉलीवूडला इग्नोर करू शकतो पण विद्युत जामवालला नाही.

Crakk Teaser Out

23 फेब्रुवारीला रिलीज होणार क्रॅक: जीतेगा तो जिएगा

विशेष म्हणजे विद्युत जामवालने चित्रपटामध्ये कामच केलेले नाही तर चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. फतेही आणि एमी जॅक्सनही क्रॅक चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. क्रॅक’चे दिग्दर्शन आदित्य दत्तने केले आहे.

Also Read: Hanuman Trailer: अंगावर शहारे आणणारा सीन आणि मंत्र जापने भरलेली क्लिप, ‘हनुमान’ चा ट्रेलर रिलीज

Leave a comment