प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन, वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pankaj Udhas Passes Away: मनोरंजन विश्वामधून एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज गायक पंकज उधास यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी नायब उधास हिने त्यांच्या निधनाची बातमी शेयर केली आहे. पोस्ट शेयर करत तिने लिहिले आहे कि कि, आम्हाला सांगताना अत्यंत दु:ख होत आहे कि, पद्मश्री पंकज उधास यांचे 26 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांना वयाशी संबंधित आजार होते. 10 दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शेवटचे फोटो आले समोर

Pankaj Udhas Passes Away

News Title: pankaj udhas passes away