Pooja Sawant: पूजा सावंतचा होणाऱ्या नवऱ्याबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली; ‘माझ्या आईच्या मैत्रिणीने…’

Pooja Sawant: अभिनेत्री पूजा सावंत मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेमध्ये आहे. नुकतेच तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्याचबरोबर साखरपुडा उरकल्याची गुड न्यूज देऊन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता नुकतेच पूजाने एका मुलाखतीदरम्यान तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे. पूजाने त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा आणि लव्हस्टोरीबद्दल उलघडा केला.

कसे भेटले Pooja Sawant आणि सिद्धेश

मुलाखतीमध्ये बोलताना पूजा म्हणाली कि, ‘खरं तर मला धक्काच बसला होता. मला कधी असं वाटलं देखील नव्हतं कि असं काही होईल. आमची अरेंज मॅरेज पद्धतीने भेट झाली. पहिल्या भेटीमध्येच तो मला आवडला होता. माझ्या आईच्या मैत्रिणीने ते स्थळ आणलं होतं. फोटो पाहताच मी त्याच्या प्रेमात पडले.

Pooja Sawant

त्यानंतर मी त्याला फोन केला. मग आमचं हळू हळू बोलणं सुरु झालं आणि आम्ही प्रेमात पडलो. सगळ्यांना वाटत होतं कि त्यामध्ये इतकं काय गुपित ठेवायचं, पण गुपित होतं तेच बरं होतं. त्यामुळे आम्हाला एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा खूप वेळ मिळाला. जेव्हा आम्हाला वाटलं कि आता आपण लग्न करायला हवं तेव्हाच आम्ही आपल्या कुटुंबियांना सांगितलं.

जेव्हा मुलं-मुली वयामध्ये येतात तेव्हा त्यांच्या मागे त्यांचे कुटुंबीय खूप लागतात. माझ्यासोबत देखील असंच झालं. जेव्हा मी पहिल्यांदा सिद्धेशचा फोटो बघितलाच तेव्हा माझ्या मनामध्ये घंटा वाजली होती. सुरुवातीला आम्ही फोनवरच बोलत होतो पण त्यानंतर जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मनामध्ये दुसरी घंटा वाजली. त्यानंतर आम्ही बराच वेळ एकत्र घालवला. गेली दीड वर्षे त्यांनी हे नातं लपवून ठेवलं होतं.

Pooja Sawant

कधी करणार लग्न (Pooja Sawant on Wedding)

पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण आहे. सिद्धेश हा अभिनय क्षेत्रामधून नाही तर परदेशामध्ये असतो. पूजाने सिद्धेशसोबतचे फोटो शेयर करून साखरपुडा झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. सिद्धेशला त्याच्या कामामधून आणि प्रोजेक्ट्समधून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही लग्न करणार असल्याचे ती म्हणाली.

Also Read: साडी, कपाळी टिळा… अभिनेत्री जुई गडकरीने घेतले उज्जैन येथील महाकालेश्वरचे दर्शन, फोटोज व्हायरल

Leave a comment