सचिन तेंडूलकर पासून विराट कोहली पर्यंत राम मंदिर प्राण प्रतिष्ठासाठी पोहोचले ‘हे’ क्रिकेटर्स, तर धोनी आणि रोहित…

Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा आता पूर्ण झाली आहे. अशामध्ये भारतीय खेळाडू देखील अयोध्यामध्ये पाहायला मिळाले. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडूलकर पासून ते विराट कोहली पर्यंत अनेक खेळाडू रामलालाच्या दर्शनासाठी अयोध्याला पोहोचले. तर काही खेळाडू असे देखील आहेत जे पाहायला मिळाले नाहीत.

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा – Ram Mandir Pran Pratishtha

नुकतेच भारतीय क्रिकेटर्सचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर पासून अनिल कुंबळे, मिताली राज सारखे खेळाडू पाहायला मिळाले. तर एका व्हिडीओ मध्ये देखील सांगितले गेले कि विराट कोहली देखील अयोध्यामध्ये पोहोचला आहे.

रामलल्लाचे दर्शन कण्यासाठी पोहोचलेला अनिल कुंबळे म्हणाला कि हा एक अद्भुत क्षण आहे. याचा भाग बनल्याने मी धन्य झालो. हा खूप ऐतिहासिक क्षण आहे. रामलल्लाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी उत्सुक आहे.

या प्रसंगी महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज देखील पाहायला मिळाली. ती म्हणाली कि आपण सर्वजण अनेक दिवसांपासून या प्रतीक्षेमध्ये होतो. या मोठ्या प्रसंगी इथे येणे एक मोठे आव्हान आहे. हा एक उत्सव (Ram Mandir Pran Pratishtha) आहे आणि मी या उत्सवाचा भाग बनल्यामुळे खूपच खुश आहे.

रामललाच्या प्रतिष्ठापणेच्या पार्श्वभूमीवर अयोध्या शहरासह भारतातील प्रत्येक भागात आनंदाचे वातावरण आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भारतीय किकेटर्स देखील दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मुंबईहून अयोध्येत दाखल झाला आणि सचिनने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. त्याचबरोबर रविंद्र जडेजाने या प्रसंगी आपली उपस्थिती दर्शवली.