Ram Mandir Prasad At Home: खरोखरच घरपोच मिळणार का राम मंदिरचा प्रसाद, जाणून घ्या संपूर्ण सत्य !

Ram Mandir Prasad At Home: काही दिवसांपासून सोशल मिडियावर KHADI ORGANIC नावाने एक वेबसाईट चर्चेमध्ये आली आहे. त्यांचे म्हणणे आहे कि राम मंदिर प्राण प्रतिष्ठानंतर ते तुम्हाला घरपोच प्रसाद देतील आणि अशा अनेक प्लॅटफॉर्मने आश्वासन दिले आहे कि ते प्रसाद वितरण करणार आहेत. खादी ऑरगॅनिकचे संस्थापक आशिष आहेत जे NorthEastern University चे प्रोफेसर आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये म्हंटले आहे कि Free Ram Mandir Parsad एक सोशल मिशन आहे, जे श्री रामच्या भक्तांना प्रसाद पोहोचवण्याचे काम करणार आहेत. पण त्यांचे म्हणणे आहे कि Free Ram Mandir Prasad राम मंदिर चे ट्रस्ट देणार नाही तर हे कम आशीष आणि त्यांची टीम करणार आहे.

Ram Mandir Prasad At Home

आज आपण जाणून घेणार आहोत कि Free Ram Mandir Prasad खरंच मिळणार कि हि बातमी फेक आहे. खरंच खादी ऑरगॅनिकने Ram Mandir Prasad घरपोच देण्याचे आश्वासन दिले आहे. चला तर जाणून घेऊया कि तुम्ही कशाप्रकारे राम मंदिर प्रसाद घर बसल्या फ्रीमध्ये मागवू शकता. कंपनीचे म्हणणे आहे कि Ayodhya Ram Mandir’s Pran Pratishtha चे अशीर्वार्द शेयर करण्यासाठी समर्पित आहे. जर तुम्ही Ram Mandir Parsad फ्री मध्ये मिळवू इच्छित असाल तर हे आर्टिकल संपूर्ण वाचा.

Ram Mandir Prasad: खरच घरपोच फ्रीमध्ये मिळणार प्रसाद?

आम्ही आधीच सांगितल्या प्रमाणे काही दिवसांपासून सोशल मिडियावर फ्रीमध्ये राम मंदिर प्रसादाचे मोफत वाटप होत असल्याची चर्चा आहे. मात्र तुम्हला घरपोच प्रसाद मिळेल का? असे म्हंटले जात आहे कि हि बातमी खोटी आहे, कारण राम मंदिर ट्रस्ट कडून याबद्दल कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. असे असे त्यांनी खादी ऑरगॅनिक च्या अबाउट अस पेजमध्ये सांगितले गेले आहे. त्यांनी म्हंटले आहे कि राम जन्म भूमी सोबत कोणताही करार केलेला नाही.

सावधान रहा!

विनोद बंसल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “व्हीआयपी दर्शनाच्या नावावर आणि घरी बसून प्रसाद मिळवण्याच्या नावावर रामभक्तांची दिशाभूल करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमेझॉनसारख्या संकेतस्थळांवर देखील अशा अनेक जाहिराती पाहायला मिळत आहेत. समाजाने यापासून सावध राहावे. या कामामध्ये ShriRamTeerth ने कोणालाहि अधिकृत केलेले नाही. या संकेतस्थळांनीही अशा खोट्या जाहिराती तत्काळ हटवाव्यात, अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल.” तुम्हाला सर्वांना विनंती आहे कि Ram Mandir Prasad मोफत वाटण्याच्या नावाखाली तुमच्याकडून डिलिव्हरी चार्जची मागणी होत असेल तर अशा अफवांपासून दूर राहावे.

Ram Mandir Prasad At Home

खादी ऑरगॅनिक बद्दल

Ayodhya Ram Mandir’s Pran Pratishtha च्या आशीर्वादाने खादी ऑरगॅनिक राम भक्तांना प्रसाद वितरण करणार आहे. अशी घोषणा सरकार किंवा राम मंदिर ट्रस्ट कडून केली गेलेली नाही. राम मंदिर प्रसाद मिळवण्यासाठी सर्वात पहिला khadiorganic.com वर जाणून फ्री प्रसाद साठी रजिस्टर करावे लागेल.

मोफत राम मंदिर प्रसादावर खादी ऑरगॅनिकचे विधान

खादी ऑरगॅनिकने त्यांच्या वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर स्पष्टपणे लिहिले आहे की काही कारणांमुळे ते प्रसाद वितरण हाताळू शकत नाही आहेत. राम मंदिर प्रसादच्या नावाखाली या कंपनीने प्रचंड डिलिव्हरी चार्जेस आकारले आणि आता प्रसाद पोहोचवण्याचा पर्याय काढून टाकला आहे. कृपया अशा जाहिरातींपासून दूर राहा.

Ram Mandir Prasad At Home

कंपनीची स्पष्टीकरण

“प्रिय लोकांनो, खादी ऑरगॅनिक तुमच्या सहकार्याबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे. काही अभूतपूर्व कारणांमुळे प्रसाद वाटप शक्य होत नाही. कृपया धीर धरा आणि जर तुम्ही प्रसाद घेण्यासाठी डिलिव्हरी चार्जसह बुक केले असेल तर तुमचे पैसे लवकरच तुमच्या खात्यात परत केले जातील.”