Salaar Box Office Collection Day 3 : बॉक्स ऑफिसवर ‘सालार’ चे वादळ, तीन दिवसात कमवले तब्बल इतके करोड

Salaar Box Office Collection Day 3 : प्रभास स्टारर चित्रपट शुक्रवारी जगभरामध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाला दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग केली आहे. पहिल्याच दिवशी 80 करोडचे कलेक्शन (Salaar Box Office Collection Day 1)करून चित्रपटाने सर्वांना चकित केले होते. शनिवारी रिलीजच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाने तुफानी कलेक्शन (Salaar Box Office Collection Day 2) जारी ठेवत वर्ल्ड वाईड 180-200 करोडचे कलेक्शन केले. तर तिसऱ्या दिवशी देखील सालार कडून जबरदस्त कमाई करण्याची अपेक्षा होती आणि चित्रपटा अपेक्षा पूर्ण केल्या. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी प्रभास स्टारर सालारने तुफानी कलेक्शन (Salaar Box Office Collection Day 3) जारी ठेवले. या चित्रपटामध्ये दर्शकांना पहिल्यांदाच प्रभास आणि श्रुती हसनची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली.

Salaar Box Office Collection Day 3

तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Salaar Box Office Collection Day 3)

सालारच्या रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर वादळ आले आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने तुफानी कमाई केली. एक दिवस आधी रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाने जवळ जळव 35 करोडचे कलेक्शन केले तर प्रभास स्टारर सालारचे ओपनिंग कलेक्शन जवळ जळव 80 करोड राहिले. दुसऱ्या दिवशी देखील चित्रपटाने जगभरामध्ये जवळ जवळ 180-200 करोडचे जबरदस कलेक्शन केले.

तिसऱ्या दिवशी देखील चित्रपटाचे तुफानी कलेक्शन जारी आहे. रविवारी चित्रपटाने देशामध्ये जवळ जवळ 65 करोडची (Salaar Box Office Collection Day 3) कमाई केली. यासोबत सालार यावर्षीच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या लिस्टमध्ये सामील झाला आहे. बाहुबली आणि बाहुबली 2 च्या जबरदस्त सफलतेनंतर प्रभासने साऊथ इंडस्ट्रीमध्ये मोठा स्टार म्हणून स्वतःला सिद्ध केले होते. सालारच्या सफलतेनंतर त्याच्या स्टारडमला मजबुती मिळाली.

बॉलीवूडवर साऊथ चित्रपटांचे वर्चस्व

कोरोना काळामध्ये बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री वाईट टप्प्यात पोहोचली. तेच साऊथ चित्रपटांनी पुन्हा एकदा दर्शकांना चित्रपटगृहांमध्ये आणण्याचे काम केले. ज्यानंतर साऊथसोबत बॉलीवूड चित्रपटांना देखील दर्शक मिळू लागले. एकीकडे जिथे बॉलीवूड चित्रपट फ्लॉप ठरत होते तर त्यावेळी साऊथ चित्रपटांनी तुफानी कमाई केली, ज्यामुळे भारतीय फिल्म जगतामध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा दबदबा निर्माण झाला. बाहुबली स्टार प्रभासचा चित्रपट पुन्हा तो दबदबा कायम करत आहे. बॉलीवूडचा किंग खानच्या डंकीच्या कमाईचा वेग रोखून सालार रेकॉर्ड करत आहे.

Leave a comment