समीप आली लग्नघटिका! स्वानंदी-आशिष यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्रीने शेयर केले खास फोटो

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Wedding : मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये सध्या लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार विवाहबंधनात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच लोकप्रिय गायिका मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे विवाहबंधनात अडकले. आता लवकरच दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी विवाहबंधनात (Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Wedding) अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाच्या अगोदरच्या विधीला सुरुवात देखील झाली आहे.

हेही वाचा: हळद लागली…! गौतमी देशपांडेला लागली स्वानंद तेंडुलकरची उष्टी हळद, हळदीचे फोटो आले समोर

स्वानंदीने शेयर केले फोटो (Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Wedding)

नुकतेच स्वानंदीने सोशल मिडियावर तिच्या मेहेंदीचे फोटो शेयर केले होते, स्वानंदीच्या मेहेंदीच्या सोहळ्यासाठी फुलांची खास सजावट केली गेली होती. त्याचबरोबर मोठ्या फलकावर वेलकम टू स्वानंदीची मेहंदी… असं देखील लिहिण्यात आले होते. यादरम्यानचा दोघांचा लुक देखील समोर आला होता. स्वानंदीचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Wedding

आता स्वानंदी आणि आशिषच्या लग्नाच्या अगोदरच्या विधींची सुरुवात झाली आहे. स्वानंदीने नुकतेच आपल्या इंस्टा स्टोरीमधून याचे काही फोटो शेयर केले आहेत. फोटोमध्ये दोघेहि मुंडावळ्या बांधलेले पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर गळ्यामध्ये दोघांनी हार देखील देखील घातले आहेत. फोटो शेयर करत तिने लिहिले आहे कि, मी आता या मुलासोबत लग्न करायला आणखी वाट पाहू शकत नाही. त्याचबरोबर स्वानंदीने लग्नाआधीचे विधी असा हॅशटॅगदेखील वापरला आहे.

काही महिन्यांपूर्वी स्वानंदी आणि आशिषने गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांनाचा धक्का दिला होता. आमचं ठरलंय असं म्हणत तिने लग्नाची घोषणा केली होती. आता लवकरच हे कपल विवाहबंधनात अडकणार आहेत. चाहते देखील त्यांच्या लग्नही आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a comment