Talathi Bharti : तलाठी भरती परीक्षेचा निकाल कधी लागणार? गुणवत्ता यादी अन् नियुक्तीपत्राबाबत आली मोठी अपडेट

Talathi Bharti 2023 Result Date Update : तलाठी पदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तर प्रत्रिका तयार झाली असून त्यावर हरकती मागवण्यात येत आहेत. हरकती एकत्रित करून 31 ऑक्टोबर पर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येतील. मग त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल जहीर होणार आहे. त्याचबरोबर गुणवत्ता यादी 15 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात येईल.

Talathi Bharti

उमेदवारांना उत्तरपत्रिकेबाबत हरकती नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. येत्या 16 ऑक्टोबरपर्यंत सर्व हरकती एकत्रित करण्यात येणार आहे. हरकत नोंदविण्यासाठी 100 रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे. एकत्रित केलेल्या सर्व हरकती प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या गटाकडे पाठविण्यात येतील. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी 31 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अंतिम उत्तरपत्रिका जारी केली जाईल. त्यानुसार, उमेदवारांना परीक्षेत किती गुण मिळाले हे कळणार आहे,’ असे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त तथा परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी सांगितले.

Talathi Bharti 2023 : 15 डिसेंबरला रोजी येणार गुणवत्ता यादी

तलाठी परीक्षेच्या (Talathi Bharti 2023) निकालाची अंतिम गुणवत्ता यादी 15 डिसेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पुढील महिनाभराचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर 26 जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील,’ असेही आनंद रायते यांनी सांगितले.

उमेदवारांनी घेतलेली हरकती योग्य असल्यास त्यानुसार उत्तरपत्रिकेत शक्य ते बदल करण्यात येणार आहे. हरकतीसाठी घेतलेले 100 रुपये शुल्क संबंधित उमेदवाराला परत केले जाईल. राज्यपालांच्या हस्ते 26 जानेवारी २०२४ रोजी उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यानंतर फेब्रुवारीत उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे निश्चित केली जातील, असं अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी सांगितलं.

Leave a comment