Gautami Deshpande Wedding : अखेर गौतमी देशपांडे झाली विवाहबद्ध; मराठमोळ्या पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

Gautami Deshpande Wedding : मराठी कलाविश्वामध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. एकमागून एक अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेत. यामध्येच आता अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने देखील लगीनगाठ बांधली आहे. स्वानंद तेंडुलकर सोबत गौतमी विवाहबद्ध झाली. लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गौतमी सतत तिच्या अफेयर रिलेशनमुळे चर्चेमध्ये होती. अखेर तिने स्वानंदसोबत लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. गौतमी सोशल मिडिया वर देखील खूपच सक्रीय असते. तिने आपल्या लग्नातील प्रत्येक सोहळ्याचे फोटो, विधीचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. तिने शेयर केलेल्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

इंस्टाग्रामवर शेयर केले फोटो (Gautami Deshpande Wedding Photo)

गौतमीने मराठमोळ्या पद्धतीने स्वानंद सोबत लग्न केले आहे. लग्नामध्ये तिने मोटी आणि गोल्ड कलरची सुंदर साडी घातली होती. सोबत लाईट पिंक कलरचे सुंदर ब्लाऊज कॅरी केले होते. तिने या लुकसही हलका मेकअप केला होता. विशेष म्हणजे ती या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तर स्वानंदने गौतमीच्या साडीला मॅच होईल अशी शेरवानी परिधान केली होती. यादरम्यान कपल खूपच सुंदर दिसत होते.

सोशल मिडियावर गौतमीने शेयर केले फोटो (Gautami Deshpande Wedding Photo) अल्पावधीमध्येच तुफान व्हायरल झाले आहेत. चाहते देखील तिच्या फोटोवर कमेंट करून तिला शुभेच्छा डेट आहेत. इतकेच नाही तर अनेक दिग्गज कलाकारांनी देखील तिच्या फोटोवर कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सारंग साठ्ये याने लफडी गँगमध्ये स्वागत असं भन्नाट कॅप्शन अस कॅप्शन देऊन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: हळद लागली…! गौतमी देशपांडेला लागली स्वानंद तेंडुलकरची उष्टी हळद, हळदीचे फोटो आले समोर

Leave a comment