Tripti Dimri Dance Video: ‘अ‍ॅनिमल’ मधील ‘भाभी-2’ तृप्ति डिमरीचा जबरदस्त डांस, पाहून चाहत्यांना सुटला ताबा

Tripti Dimri Dance Video: ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामध्ये प्रसिद्ध झालेली अभिनेत्री तृप्ति डिमरीचा (Tripti Dimri Dance Video) एक डांस व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तृप्ति करीना कपूरच्या बोले चुडिया गाण्यावर जबरदस्त डांस करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

रणबीर कपूरच्या गाण्यावर केला डांस – Tripti Dimri Dance Video

तृप्ति डिमरीने आपला विकेंड मस्त एन्जॉय केला. तृप्तिने इंस्टाग्राम स्टोरीवर विकेंडच्या मजा-मस्तीचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये तृप्ति रणबीर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’ गाण्यावर डांस करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तृप्तिने मनसोक्तपणे डांस करून आपल्या डांस मूव्हने एकध खळबळ उडवून दिली आहे.

Tripti Dimri Dance Video

तृप्ति डिमरीने बोले चुडिया गाण्यावर केला जबरदस्त डांस

तृप्ति डिमरीने फक्त रणबीर कपूरच्याच गाण्यावर डांस केला नाही तर करीना कपूर खानच्या बोले चुडिया गाण्यावर देखील डांस (Tripti Dimri Dance Video) केला. अभिनेत्री कभी ख़ुशी कभी गम चित्रपटामधील बोले चुडिया गाण्यावर थिरकताना दिसली. तिने आपल्या डांस मूव्हने सर्वांना मंत्रमुग्ध केले. सोशल मिडियावर तृप्तिचा हा डांस व्हिडीओ व्हायरल होत आहे. वेस्टर्न ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. लोक तृप्तिच्या डांसचे खूपच कौतुक करत आहेत.

तृप्ति डिमरी चे आगामी चित्रपट

तृप्ति डिमरी ने आपल्या करियरची सुरुवात 2017 मध्ये पोस्टर बॉईज चित्रपटामधून केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. नंतर ती लैला मजनू चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळाली. तृप्ति ला खरी ओळख नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या बुलबुल मधून मिळाली. कला मधून देखील तृप्ति ने आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकेल होते. पण तील सर्वात जास्त प्रसिद्धी ‘अॅनिमल’ चित्रपटामधून मिळाली. ती या चित्रपटामधून रातोरात स्टार बनली.

Tripti Dimri Dance Video

‘अ‍ॅनिमल’ मधी भाभी नंबर 2 म्हणून तृप्ति रातोरात नॅशनल क्रश बनली. इंस्टाग्राम वर देखील तिची फॅन फॉलोइंगही प्रचंड वाढू लागली आहे. सध्या तिला 3.9 मिलियन लोक फॉलो करतात. तृप्ति च्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती विक्की कौशलसोबत ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Also Read: रवीना टंडनच्या Karmaa Calling चा दमदार टीजर रिलीज, दमदार भूमिकेत दिसली अभिनेत्री

Leave a comment