Upcoming Electric Cars: 2024 मध्ये लाँच होणार या इलेक्ट्रिक कार्स, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Upcoming Electric Cars 2024: भारतमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची झपाट्याने वाढत आहे. या ट्रेंड पाहून कार उत्पादक कंपन्या देशामध्ये नवीन इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहेत. या लेखामधून आपण अशा काही इलेक्ट्रिक कार्सबद्दल जाऊन घेणार आहोत ज्या लवकरच भारतामध्ये लाँच (Upcoming Electric Cars) होणार आहेत.

Upcoming Electric Cars 2024

1. महिंद्रा XUV700, Scorpio, Thar
Upcoming Electric Cars

महिंद्राच्या टीन नवीनतम आणि सर्वात लोकप्रिय एसयूवी इलेक्ट्रिक असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक एसयूवीचा लाँच टाईमलाईन 2-3 वर्षांसाठी नियोजित आहे आणि ब्रँडच्या बॉर्न इलेक्ट्रिक INGLO स्केटबोर्ड आर्किटेक्चरचा वापर यामध्ये असेल. बॅटरी पॅकची क्षमता सुमारे 60 kWh असेल आणि एका चार्जवर 450-500 किमी रेंज दावा केला जाईल.

2. टाटा Harrier, Safari, Punch
Upcoming Electric Cars

टाटा मोटर्सने 2023 ऑटो एक्सपोमध्ये हॅरियर ईव्हीची इलेक्ट्रिक आवृत्ती आधीच सादर केली आहे आणि सफारी ईव्ही देखील अशाच डिझाईनमध्ये पेश केली जाईल. पंच ईवी भारतामध्ये 2023 च्या सरतेशेवटी किंवा 2024 च्या सुरुवातीला डेब्यू करेल. तर इतर दोन 2024 मध्ये लाँच होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

3. हुंडई Creta, Exter
Upcoming Electric Cars

Creta आणि Exeter त्यांच्या ICE अवतारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जन्स देखील पाईपलाईनमध्ये आहेत. क्रेटा ईवीच्या टेस्टचा प्रारंभिक टप्पा आधी सुरु झाला आहे आणि आपण टेस्ट म्युल पहिलेच आहे. मिड-साइज ईवी एसयूवी लाँच ईयर 2025 निर्धारित करण्यात आली आहे आणि हि कोना ईवी सोबत पॉवरट्रेन शेअर करेल, जे 39.2 kWh बॅटरी पॅक वापरेल. दुसरीकडे Exeter EV ला स्पेक्ट्रमच्या किफायतीमध्ये ठेवले जाईल, जी सरळ टाटा पंच ईवी आणि सिट्रॉन ईसी3 ला टक्कर देईल.

4. होंडा Elevate
Upcoming Electric Cars

होंडा कार्स इंडियाने आपल्या नवीन एलीवेटच्या आवृत्तीला पुढच्या तीन वर्षांमध्ये लाँच (Upcoming Electric Cars) करण्याची घोषणा केली आहे. मिड-साइज एसयूवीला सध्या पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळतो आणि एलीवेट ईवी साठी मार्ग बनवण्यासाठी हायब्रिड सोडण्यात आले आहे. तथापि यावेळी इलेक्ट्रिक कारबद्दल तपशील कमी असला तरी आपण आशा करूयात कि 2024 च्या वर्ष अखेरीस कंपनी काही ठोस बातमी शेयर करेल.

5. मारुति सुजुकी WagonR EV, Jimny EV
Upcoming Electric Cars

मारुति सुजुकी 2030 पर्यंत सहा नव्या ईवी लाँच (Upcoming Electric Cars) करणार आहे आणि यामध्ये बहुतेक कार्स एकदम नवीन असतील. तथापि लाईन-अप बद्दल सध्या जास्त माहिती उपलब्ध नाही. आपण फक्त 2023 ऑटो एक्सपो मध्ये इलेक्ट्रिक ईवीएक्सची संकल्पना पाहिली आहे. एक लिक झालेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिक WagonR आणि Jimny सारख्या EV च्या बातम्या मार्केटमध्ये व्हायरल होत आहेत. WagonR EV ला परवडणाऱ्या मास-मार्केट सेगमेंटला लक्ष्य केले जाईल.

6. रेनॉल्ट Kwid EV
Upcoming Electric Cars

नुकतेच रेनॉल्टद्वारे क्विड ईवी लाँच करणार असल्याची पुष्टी करणायत आली होती आणि हि 2024 च्या सरतेशेवटी किंवा 2025 च्या सुरुवातीला डेब्यू करण्याचा अंदाज आहे. इलेक्ट्रिक क्विड त्या नऊ मॉडेल्सचा भाग असेल ज्या पुढच्या 2-3 वर्षांमध्ये लाँच होणार आहेत.

Also Read: New Mahindra Thar 5-Door आपल्या जबरदस्त लुकने उडवणार धमाल, समोर आली हि माहिती

Leave a comment