Vrinda Dinesh: IPL प्रमाणे महिलांसाठी देखील भारतामध्ये T20 लीगचे आयोजन केले जाते. वूमन प्रीमियर लीग (WPL-2024) च्या आगामी सीजनपूर्वी मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या ऑक्शन मध्ये वृंदा दिनेश (Vrinda Dinesh) वर करोड रुपयांचा पाऊस पडला. वृंदाला यूपी वॉरियर्स (UP Warriors) ने 1.3 करोड रुपयांची मोठी बोली लावून आपल्या ताफ्यामध्ये सामील केले. विशेष म्हणजे वृंदाने आजपर्यंत एक देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही.
Vrinda Dinesh ची बेस प्राईस 10 लाख
वूमन प्रीमियर लीगच्या (WPL) आगामी सीजनसाठी प्लेयर्सचा लिलाव मुंबईमध्ये शनिवारी झाला. यादरम्यान 22 वर्षीय प्लेयरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पाहता पाहता बोली करोडोच्या पुढे गेली. या प्लेयरचे नाव Vrinda Dinesh आहे. वृंदाने आपल्या फलंदाजीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे. यासोबतच वृंदा ऑक्शनमधील सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू ठरली. यूपी फ्रँचायझीने तीला 1.3 करोड रुपयांमध्ये संघात समाविष्ट केले.
कर्नाटकशी आहे संबंध
वृंदा दिनेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करते. आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या वृंदाने अद्याप एक देखील आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. ती टॉप ऑर्डर बॅट्समन आहे आणि पॉवर हिटिंगसाठी प्रसिद्ध होत आहे. जूनमध्ये अंडर-23 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाची ती सदस्य होती. तिने एसीसी महिला इमर्जिंग टीम कपच्या फायनलमध्ये बांगलादेश ए विरुद्धच्या सामन्यामध्ये 29 चेंडूमध्ये 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 36 धावांची खेळी केली होती. इंडिया ए टीमने सामना 31 धावांनी जिंकून किताब आपल्या नावावर केला होता.
सीनियर वनडे कपमध्ये देखील केली धमाल
सीनियर वनडे कपमध्ये देखील केली धमाल
याच वर्षी कर्नाटकच्या सिनियर महिला वनडे कपच्या फायनलमध्ये संघाला पोहोचवण्यासाठी वृंदा दिनेशने महत्वाची भूमिका बजावली होती. तेव्हा ती टूर्नामेंटमध्ये तिसरी सर्वात जास्त धावा बनवणारी प्लेयर बनली होती. तिने 11 डावांमध्ये 47 च्या सरासरीने 477 धावा बनवल्या. यामध्ये राजस्थानच्या विरुद्द सेमीफायनल सामन्यामध्ये 81 धावांची संस्मरणीय खेळी केली होती.
Also Read