Bumrah Wife: भारतीय क्रिकेटर्सची लव्ह स्टोरी खूपच चर्चेमध्ये राहते. क्रिकेटरप्रमाणे त्यांच्या पत्नीदेखील नेहमी लाइमलाइटमध्ये राहतात. क्रिकेटर्स जेव्हा मैदानामध्ये चौकार-षटकार मारतात तेव्हा त्यांच्या पत्नी देखील खूप चर्चेमध्ये राहतात. अनेक क्रिकेटर्स च्या पत्नी सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन देखील नेहमी चर्चेमध्ये राहते. ती नेहमी तिच्याबद्दल आणि पती जसप्रीत बुमराह बद्दल अपडेट शेयर करत असते. यादरम्यान जसप्रीत बुमराहने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे, जी पाहिल्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला वाईटरित्या ट्रोल केले. प्रकरण इथेच थांबले नाही तर जसप्रीत बुमराहची पत्नी यावर खूप भडकली.